गोल पोस्ट राजकारण काँग्रेस-राष्ट्रवादीची आज बैठक

काँग्रेस-राष्ट्रवादीची आज बैठक

नवी दिल्ली: काल होणारी बैठक रद्द झाल्यामुळे आज राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामध्ये दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी व शिवसेना यांच्या सरकार स्थापनेबाबत च्या महत्वाच्या बाबी आज या बैठकीतून समोर येण्याची शक्यता आहेत.
आज शरद पवार यांच्या निवासस्थानी होणाऱ्या या काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या बैठकीत राज्यातील प्रस्तावित सरकारच्या रचनेवर शिक्कामोर्तब होणार आहे. सरकार पाच वर्षे टिकावे आणि यानिमित्ताने काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसेच शिवसेना सोबत होणारी मैत्री स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक काळातही कायम राहावी असा प्रयत्न दोन्ही काँग्रेसचा असेल. वादग्रस्त मुद्द्यांवर नियंत्रण करण्यासाठी सुकाणू समिती बनविणे यावरही बैठकीत निर्णय अपेक्षित आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version