राफेल डील बाबत काँग्रेस पुन्हा ऍक्टिव्ह, मोदी चौकशी पासून वाचण्याचा करत आहेत प्रयत्न

नवी दिल्ली, ५ जुलै २०२१: काँग्रेस पुन्हा एकदा राफेल डील बाबत ॲक्शन मोडवर आले आहे.  राहुल गांधी यांनी रविवारी एक ट्विट केले.  यात त्यांनी विचारले की, जॉइंट पार्लियामेंट्री कमेटी(जेपीसी) च्या तपासा पासून मोदी स्वतःला का वाचवत आहेत? याच्या उत्तरासाठी त्यांनी  चार पर्याय देखील दिले आहेत.
 १. मोदींना अपराधीपणाची भावना आहे.
 २. त्यांना आपल्या मित्रांना वाचवायचे आहे.
 ३. जेपीसीला राज्यसभेची जागा नको आहे.
 ४. हे सर्व पर्याय बरोबर आहेत.
 राहुल गांधी यांनी इंस्टाग्रामवरही एक पोस्ट केली आहे.  यात त्यांनी एक छायाचित्र पोस्ट केले आहे, या छायाचित्रात एका व्यक्तीचा अर्धा चेहरा दाखवला गेला आहे आणि त्याच्या दाढी मध्ये राफेल विमान दाखवले आहे.  राहुल यांनी लिहिले की, “चोराची दाढी”….  राहुल यांनी येथे कोणाचेही नाव लिहिले नाही.  पण राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची दाढी दाखवल्याचे स्पष्ट दिसत आहे.
 काँग्रेस- फ्रान्सने तपासाचे आदेश दिले, दिल्ली गप्प का?
कॉंग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेतली.  ५९ हजार कोटींच्या राफेल सौद्यात मोदींना जेपीसीचा तपास का टाळायचा आहे, असं त्यांनी वक्तव्य केलं. ते पुढे म्हणाले की’ “फ्रान्स सरकारने राफेल सौद्यात भ्रष्टाचार, लोकांवर प्रभाव टाकणे, मनी लॉन्ड्रिंग आणि पक्षपातीपणा या आरोपाची चौकशी करण्यासाठी एक न्यायाधीश नेमला आहे.  संपूर्ण जग आणि संपूर्ण देश नवी दिल्लीकडे पाहत आहे.  ते गप्प का आहेत?”
राफेल सौदा सर्वोच्च न्यायालयात
फ्रान्सच्या माध्यमांमध्ये असे वृत्त आले होते की, राफेल सौद्यातील क्लायंटला मोठी रक्कम देण्यात आली होती.  यानंतर सर्वोच्च न्यायालयात नवीन याचिका दाखल करण्यात आली.  त्यात राफेल कराराची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.  तेव्हा मुख्य न्यायाधीश एस.ए. बोबडे यांनी नंतर यावर सुनावणी होईल असे म्हटले होते.  तथापि, त्यांनी कोणत्याही तारखेचा उल्लेख केला नाही.
 दोन वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने कोर्टाच्या देखरेखीखाली राफेल कराराच्या चौकशीची मागणी करणार्‍या सर्व याचिका फेटाळून लावल्या.  १४ डिसेंबर २०१८ रोजी सुप्रीम कोर्टाने या कराराच्या प्रक्रियेत आणि पाटनर सिलेक्शन मध्ये कोणत्याही प्रकारच्या आरोपांना निराधार असल्याचे म्हटले होते.
फ्रेंच भ्रष्टाचारविरोधी एजन्सी एएफएच्या तपासणी अहवालाच्या संदर्भात फ्रेंच माध्यमात एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.  त्यानुसार, डसॉल्ट एव्हिएशनने काही बोगस देयके दिली आहेत.  २०१७ च्या कंपनीच्या खात्यांच्या लेखापरीक्षणामध्ये ग्राहकांच्या भेटीच्या नावावर ५ लाख ८ हजार ९२५ युरो (४.३९ कोटी रुपये) खर्च झाला.  एवढ्या मोठ्या रकमेबाबत ठोस उत्तर देण्यात आले नाही.  मॉडेल निर्मात्याचे फक्त मार्च २०१७चे बिल दर्शविले गेले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा