नवी दिल्ली, २ जून २०२१: देशातील मोठी बँक एसबीआय ने आपल्या कामकाजाच्या वेळेत बदल केलाय. एसबीआयमध्ये काम करण्याची नवीन वेळ १ जूनपासून लागू करण्यात आलीय. कोरोना महामारी च्या काळात बँकेनं आपल्या कामकाजाच्या वेळेत कपात केली होती. मात्र आता कोरोना चा प्रभाव हळूहळू कमी होताना दिसतोय. त्यामुळं बँकेनं आपली कामकाजाची वेळ वाढवलीय. पूर्वी जिथे एसबीआय शाखा सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत सुरू असे, आता त्यास २ तासांची मुदतवाढ देण्यात आलीय. आता बँकेच्या शाखा संध्याकाळी चार वाजता बंद केल्या जाणार आहेत.
सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत बँक सुरू राहणार
लॉक डाऊन च्या काळात बँक ग्राहकांना आपली दैनंदिन व्यवहारिक कामं पूर्ण करण्यासाठी बँकेच्या ठराविक वेळे मूळं अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं. आता या निर्णयामुळं एसबीआयच्या कोट्यवधी ग्राहकांना दिलासा मिळालाय. आता ते त्यांच्या सोयीनुसार बँकेशी संबंधित कामं सकाळी दहा ते सायंकाळी चार दरम्यान करू शकतील.
कोरोना संक्रमणापासून बँक कर्मचारी आणि ग्राहक दोघांचीही सुरक्षा लक्षात घेता कामाचे तास कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अशा परिस्थितीत अनेक ग्राहक बँकेत २ वाजेपर्यंत काम आटोपून निघून जायचे, परंतु त्यांना आता चार वाजेपर्यंत बँकेची कामं करता येणार आहे. तसेच एसबीआयनं बँकेच्या कामकाजाची वेळ वाढवल्यामुळे बँकेमध्ये होणारी गर्दीही कमी होणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे