अहमदपूर (जि.लातूर), २६ नोव्हेंबर २०२२ : अहमदपूर येथील यशवंत विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा गौरव दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
यावेळी इतिहास विषयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री. लक्ष्मण फड म्हणाले, की संविधान म्हणजे देशाचा आत्मा असून या संविधानामुळे सर्वांना समान दर्जा आणि चांगल्या पद्धतीचे जीवन जगता येते म्हणून सर्वांनी संविधानाचे पालन करावे.


संविधानाचे वाचन आठवीचा विद्यार्थी रोशन पवार याने केले. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक व्ही. व्ही. गंपले, प्रमुख अतिथी म्हणून एनसीसी ऑफिसर अशोक पेदेवाड, राम तत्तापुरे, अरुण मोरे, प्रमुख मार्गदर्शक लक्ष्मण फड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक राम तत्तापुरे यांनी केले. सूत्रसंचालन दीपक हिंगणे यांनी, तर शरद करकनाळे यांनी आभार मानले.
संविधान गौरव दिनाच्या निमित्ताने शाळेत विविध उपक्रम घेण्यात आले. त्यात निबंध, भाषण, चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी कल्याण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : राजमोहम्मद शेख