फलटण, २७ नोव्हेंबर २०२२ : फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीतर्फे शनिवारी (ता. २६) ‘संविधान दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संविधान उद्देशिकेचे वाचन आणि उपस्थितांना ‘संविधान उद्देशिके’चे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरवात कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार समीर यादव साहेब यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
संविधान उद्देशिकेचे वाचन पोलिस उपअधीक्षक तानाजी बर्डे साहेब यांनी केले. तर उद्देशिकेचे वाटप फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला मुधोजी हायस्कूल फलटण,प्रबुद्ध विद्या भवन फलटण, लॉ कॉलेज फलटण, फलटण उर्दू एज्युकेशन सोसायटी फलटण संचलित हाजी अब्दुल रज्जाक उर्दू हायस्कूल ॲंड ज्युनिअर काॅलेज फलटण, उर्दू प्राथमिक शाळा, फलटणचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
यावेळी मुधोजी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य. डॉ. पी. एच. कदम व डॉ. प्रभाकर पवार यांनी संविधानाचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमाला ॲड. अनिकेत अहिवळे (अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती), प्रतीक गायकवाड (उपाध्यक्ष), सुशांत अहिवळे (सचिव) व पदाधिकारी, सचिन अहिवळे (नगरसेवक ), दत्ता अहिवळे, विकास काकडे, पत्रकार रमेश आढाव, यशवंत कारंडे, आबासाहेब यादव, एस. डी. कांबळे, महादेव गायकवाड (अध्यक्ष, कामगार संघर्ष संघटना), चंदन काकडे (वस्ताद), सिद्धार्थ अहिवळे, मंगेश आवळे, ॲड. प्रशांत काकडे, ॲड. अमर झेंडे, रोहित अहिवळे, ॲड. आशा काकडे, प्रशांत आप्पा काकडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडीचे फलटण तालुका अध्यक्ष संदीप काकडे व त्यांचे पदाधिकारी उमेश कांबळे, सपना भोसले, अरविंद आढाव, अश्विनी अहिवळे उपस्थित होते.
तसेच यावेळी पत्रकार अरविंद मेहता, अमित भोईटे, अमीरभाई शेख, इम्रान नियाज अहमद कुरेशी,
महेजबीन तांबोळी, किस्मत पटेल, अक्रम जहांगीर मुल्ला (प्राचार्य) या सर्वांना संविधान उद्देशिकेची प्रत देऊन त्यांचे आभार मानण्यात आले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार