हातपंपाभोवती दुषित पाणी साचत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

7

रांझणी (माढा), दि. २६ जुलै २०२०: मौजे रांझणी तालुका माढा येथील दलीत वस्तीतील हातपंप चुकीच्या ठिकाणी खोदल्यानेहातपंपाच्या कडेला दुषित पाणी साचत आहे. मात्र या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दुसरा पर्याय नसल्याने नाईलाजाने हेच पाणी पिण्यासाठी वापरावे लागते.

हातपंपाभोवती साचलेले हे पाणी पुन्हा या हातपंपात उतरत असून दुषित पाणी पिल्याने आजार होऊ लागले आहेत. याठिकाणी साचणाऱ्या दुषित पाण्यामुळे हात पंपाच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना आजार होऊ लागले आहेत. त्याचप्रमाणे  दुषित पाणी साचत असल्याने याठिकाणी डासांचे प्रमाण अधिक वाढले आहे. यामुळे मलेरिया, डेंगू यांसारखे जीवघेणे आजार डोके वर काढत आहेत.

सामाजिक कार्यकर्ते नारायण गायकवाड यांनी गेल्या दोन वर्षांपासून याबाबत ग्रामपंचायतीला लेखी तक्रार देऊनही कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नाही. नारायण गायकवाड यांनी या हातपंपाचा व्हिडीओ बनवून अधिकाऱ्यांना पाठवला आहे. तसेच याची गंभीर दखल घेतली नाही तर रांजणी ग्रामपंचायती समोर उपोषणाला बसणार असल्याचे नारायण गायकवाड यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा