माढा, ८ ऑगस्ट २०२०: महाराष्ट्रात शेती बरोबर शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय आहे तो म्हणजे दुग्ध व्यवसाय. परंतु, सतत घसरणाऱ्या दुधाच्या दराने शेतकऱ्यांना नाकी नऊ आणले आहे. अनेक दूध आंदोलने झाली परंतु, शासनाने कोणतीही दखल घेतली नसून त्यावर अजून तरी कोणताही तोडगा निघाला नाही.
दुधाचा दर २० रुपयांवरून आता तर १८ रुपये वरती आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुधापेक्षा पाणी व्यवसाय केलेला बरा अशी धारणा होऊ लागली आहे. लाखो शेतकऱ्यांनी गाई ६० ते ७० हजार रुपये किमतीच्या विकत घेतल्या आणि पशुखाद्याची ५० किलोची एक गोणी एक हजार ते बाराशे रुपये पर्यंत गेली आहे.
त्यातच चारा, मजुरी हे पाहता दूध व्यवसाय तोट्यात गेला असून शासनाने त्वरित दुधाला लिटरमागे पाच ते दहा रुपये अनुदान देऊन या बळीराजाला आर्थिक सहकार्य करावे अन्यथा हा व्यवसाय मोडकळीस आल्यामुळे शेतकरी आत्महत्या आणखी वाढतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दुधाचे दर ढासळल्यामुळे गाई म्हशींच्या किंमती उतरल्या आहेत म्हणजेच शेतीमाला बरोबर आता शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो तोही आता परवडत नाही असाच झाला आहे. शासनाने लवकरात लवकर दूध व्यवसायास म्हणजेच दुध संघाना मदत नाकरत थेट पशुपालकांना अर्थसहाय्य करावे एवढीच बळीराजाची मागणी आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रदीप पाटील