घाटकोपर बेस्ट डेपोच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप, विद्यार्थी चाकरमान्यांना बसणार फटका

10

घाटकोपर, २ ऑगस्ट २०२३ : बेस्टच्या घाटकोपर डेपो मधील कंत्राटी चालक आज सकाळपासून अचानक संपावर गेले आहेत. पगार वाढ, सुविधा, ओव्हर टाईम अशा विविध मागण्या बाबत हे कंत्राटी कर्मचारी मागणी करत होते. या मागण्यांसाठी प्रज्ञा खजुरकर या सहकुटुंब आझाद मैदानात उपोषणाला बसल्या आहेत. त्यांना समर्थन देण्यासाठी आणि आझाद मैदानात त्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी या कंत्राटी कामगारांनी हा संप केला आहे.

मात्र याचा फटका चाकरमान्यांना बसणार आहे. घाटकोपर बस डेपो येथून मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरात तसेच शहरात मोठ्या प्रमाणात बेस्टच्या बसेस जातात. तसेच किमान सात बस डेपो मध्ये हा संप सुरू होईल अशी माहिती कामगारांनी दिली आहे. त्यामुळे सकाळीच जे चाकरमाने कामाला निघतील किंवा शाळा कॉलेजला जाणारे विद्यार्थी असतील त्यांना या संपामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर