पुण्यात बस पुरविणाऱ्या ठेकेदारांनी पुकारला संप; बससेवा ठप्प, सामान्य नागरिक, नोकरदार, विद्यार्थ्यांना मनस्ताप

पुणे, ६ मार्च २०२३ : ‘पीएमपीएमएल’च्या बसगाड्या पुरविणारे ठेकेदार अचानक संपावर गेले आहेत त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. बस पुरविणाऱ्या ठेकेदारांचे तीन महिन्यांपासूनचे बिल थकल्यामुळे चार ठेकेदारांनी अचानक संप पुकारला आहे. आज अचानक पुकारलेल्या संपामुळे शहरात पीएमपीएल बसची संख्या कमी झाली आणि यामुळे नागरिकांचे हाल झाल्याचे पाहायला मिळाले.

पीएमपीएमएल बसगाड्या पुरविणाऱ्या ठेकेदार अचानक संपावर गेल्याने सामन्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याचा फटका सामान्य पुणेकरांना सहन आहे. पुण्यात अनेक लोक ‘पीएमपीएमएल’ने प्रवास करतात. त्यात आज आठवड्याचा पहिलाच दिवस आहे. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि कर्मचारी हे दररोज या ‘पीएमपीएमएल’ने प्रवास करतात. आज अचानक बसची संख्या कमी झाल्यामुळे अनेकांना कामावर पोचायला उशीर झाल्याचे बघायला मिळाले.

‘पीएमपीएमएल’कडे सध्या २१४२ बस आहेत. यापैकी ११०० बस या ठेकेदारांच्या आहेत आणि इतर ९०० बस या पीएमपी प्रशासनाच्या मालकीच्या आहेत. ठेकेदारांनी अनेकवेळा पत्रव्यवहार करूनही त्यांना वेळेवर थकबाकी मिळालेली नाही. त्यामुळे त्यांनी शेवटी संप पुकारला आहे; मात्र या सगळ्यांचा त्रास सामान्य नागरिकांना, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच सध्या दहावी-बारावीच्या परीक्षा असल्यामुळे बसने जाणाऱ्या परीक्षार्थींना सोसावा लागत आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा