सिध्दटेक येथील साठ वर्षीय तृतीयपंथी कोरोना संशयित

कर्जत, दि. २३ मे २०२०: कर्जत तालुक्यातील राशिन या ठिकाणी ६० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे परवा मुत्यु झालेला होता आणि कर्जत तालुक्याने कोरोनाचे खाते उघडले होते. त्याच प्रमाणे सिध्दटेक या ठिकाणी ६० वर्षीय तृतीयपंथी कोरोना संशयित सापडलेला आहे. राञी उशिराने त्या संशयित रूग्णाला जिल्हा रुग्णालयात अहमदनगर या ठिकाणी हलवण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे, संशयित रूग्ण हा मुंबई या ठिकाणांहून आलेले आहे. ज्या ठिकाणाहून रूग्ण आलेले आहे तो परिसर हा रेड झोन म्हणून घोषित करण्यात आलेला होता अशी माहिती आहे. सिध्दटेक या ठिकाणी आल्यावर त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.

सर्दी , थोडासा ताप असल्याने त्या ठिकाणी असलेली कोरोना विषयच्या कमिटीने त्यांना चेक केले व पुढील तपासणीसाठी अहमदनगर जिल्हा रुग्णालय या ठिकाणी राञी उशिराने पाठवण्यात आले. सदर तृतीय पंथीला मधुमेह आणि अशक्तपणा असल्याचे ही सांगण्यात आले आहे. अशी माहिती तपासणी करणारे आरोग्य सेवक गुळवे आणि गावातील पोलिस पाटील दादासाहेब भोसले यांनी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा