कोरोनाची लस घेतल्यानंतर हरियाणाचे मंत्री झाले कोरोना पॉझिटिव्ह? बायोटेक’नं दिलं स्पष्टीकरण

हरियाणा, ६ डिसेंबर २०२०: कोवॅक्सिनच्या क्लिनिकल चाचणीत कोरोनाविरूद्ध पहिला डोस दिले गेलेले हरियाणाचे आरोग्य व गृहमंत्री अनिल विज, कोरोना पॉझिटिव्ह झाले आहे. यावर आता भारत बायोटेकनं एक निवेदन जारी केलं आहे. कंपनीनं म्हटलं आहे की, कोव्हॅक्सिन क्लिनिकल चाचणी दोन डोसांवर आधारित आहे, जी २८ व्या दिवशी दिली जावी. लसीवर किती परिणाम होतो हे दोन्ही डोसच्या १४ दिवसानंतर निश्चित केलं जाईल. कोवाक्सिन दोन डोस घेण्यास तयार केले गेले आहे त्यानंतरच ते प्रभावी होईल. अन्यथा या लसीचा प्रभाव दिसून येणार नाही.

कंपनीनं म्हटलं आहे की, फेज ३ चाचणी -ब्लाइंड आणि रॅन्डम आहे, जेथे चाचणीतील ५०% सहभागी लस घेतात आणि ५०% सहभागींना प्लेसबो मिळेल. कोव्हॅक्सिन २८ दिवसांच्या फरकानं दोनदा घेतल्यानंतरच प्रभावी होईल. परंतु या लसीची २८ दिवसाची चाचणी पूर्ण झाल्यानंतर १४ दिवसांनी याचा प्रभाव दिसून येण्यास सुरुवात होते.

कंपनीनं पुढं सांगितलं की, ही एक पूर्ण विकसित कोविड -१९ लस आहे, ज्यामध्ये २६,००० लोकांवर चाचणी घेण्यात आली आहे. आमचं लक्ष ही लस संपूर्ण भारतभर प्रभावी होण्याचं आहे. भारत बायोटेक एक लस विकसक आणि निर्माता आहे. या लसीची सुरक्षा आणि परिणामकारकता हे आमचे प्राथमिक उद्दीष्ट असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. २० वर्षांच्या इतिहासात भारत बायोटेकनं १८ देशांमध्ये ८० हून अधिक क्लिनिकल चाचण्या घेतल्या आहेत.

दरम्यान काल हरियाणाचे आरोग्यमंत्री आणि गृहमंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण झाली. त्यांनी ट्विटद्वारे त्याबद्दल माहिती दिली. तसंच, त्यांनी लोकांना सल्ला दिला आहे की, जे त्यांच्या संपर्कात आले आहेत त्यांनी त्यांची कोरोना टेस्ट करुन घ्यावी.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा