कोरोनामुळे सलून व्यावसायिकांवर आली उपासमारीची वेळ

माढा, दि. ३० जुलै २०२०: गेली साडे तीन महिने झाले कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे केश कर्तनालये (सलून) २५ मार्च पासून म्हणजे साडेतीन महिने बंद होती. जुलै महिन्यात सलून्सना परवानगी मिळाली परंतु कोरोनासारख्या महामारीच्या रोगामुळे नागरिकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे बरेच लोक सलूनमध्ये जाण्यास घाबरत आहेत. यामुळे सलून व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

नाभिक समाजातील संघटनांनी राज्य शासनाला अनेक प्रकारे निवेदन देऊनही कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत दिली नाही. किंवा सहकार्य केले नाही यामुळे नाभिक समाज आज आर्थिक विवंचनेत सापडला आहे.

ग्रामीण भागात तर खूपच विदारक दृष्य पहायला मिळते. सलून व्यवसायातून कोरोना हा आजार पसरतो अशा अफवा पसरवून या समाजावर उपासमारीची वेळ आणली आहे. तरी राज्य शासनाने सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करावी व नाभिक समाजाला केंद्र अथवा राज्य शासनाने मदत करावी अशी मागणी सलून व्यवसायिक करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा