माढा, दि.१५ ऑगस्ट २०२०: भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण उत्सव साजरे केले जातात. परंतु कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारामुळे पोळा हा सण शेतकरी राजाच्या सर्वात आवडता सण , परंतू या सणावर देखील यावर्षी विरजण पडले आहे. परंतू ज्या सणापासून इतर सणांची सुरवात होते. तो सण म्हणजे बैल पोळा मोठ्या उत्साहाने होऊ शकत नाही.
या सणाची बळीराजा एक महिना अगोदरच तयारी करत असतो.बैल असो गाय असो वा वासरु त्यांना गव्हाच्या कणकीचे गोळे सकाळ-संध्याकाळ खापरी पेंड, सरकी पेंड असे कसदार खाद्य भरपूर हिरवा चारा महिनाभर अगोदर देण्यास सुरुवात केली कारण बैल, गाय अथवा वासरू हे इतर जनावरांच्या तुलनेत रूबाबदार दिसतात.
पोळा सणाच्या आठ दिवस आगोदर गावाच्या आसपासच्या एक दोन मोठ्या शहरातील बाजारात जाऊन रंगीबिरंगी गोंडे, चंगाळ्याचे पट्टे, बेगीड सर्व वस्तूंची तयारी शेतकरी राजा करतो व घरातील इतर सदस्य पण त्याच धामधुमीत असतात, परंतू आज ग्रामीण भागात हा उत्सव उत्साह दिसून येत नाही. शेतकऱ्यांच्या घरात या सणाविषयी साधी चर्चासुद्धा होताना दिसत नाही यावर सणावर सुध्दा शासनाने काही नियम व अटी घातल्यामुळे निर्बंध आलेले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील