कोरोनामुळे शरीरात होतात हे बदल…

नवी दिल्ली  : शंभर देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले असून मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु कोरोनामुळे शरीरात नेमके कुठले बदल होतात. याबाबत स्पेनमधील एका डॉक्टरने त्यांचे अनुभव फोटोसह ट्विटर हंडेलवर शेअर केले आहेत.
कोरोनामुळे भारतामध्ये झालेला तो पहिला मृत्यू ठरला. तसेच ७० हुन अधिक रुग्णांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.परंतु याच कोरोना व्हायरसने शरिरात प्रवेश केल्यानंतर काय बदल होतात. याबाबत स्पेनमधील एका रुग्णाने आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.

स्पेनमधील मॅड्रिड शहरातील ‘यूनिवर्सिटारियो ला पाज’ या रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात तैनात असणाऱ्या डॉक्टरालाच कोरोनाची लागण झाली. कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना त्यांच्या संपर्कात आल्याने डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली. “येल तुंग चेन” असे या डॉक्टरांचे नाव आहे. कोरोना व्हायरसने शरिरात प्रवेश केल्यापासून त्यांनी सर्व लक्षणांचे अपडेट आपल्या ट्विटरवर शेअर केले आहेत. लोकांमध्ये जागरुकता पसरावी आणि ते सावध व्हावे. यासाठी डॉक्टरांनी आपला अनुभव शेअर केला आहे.
कोरोनाची लागण झाल्यानंतर ३५ वर्षीय डॉक्टर येल तुंग चेन घरातच आयसोलेशन (एकांतात) मध्ये सध्या रहात आहेत. या आजाराची लागण झाल्यानंतर फुफ्फुसात आणि शरिरात होणाऱ्या बदलांची आणि वेदनांची माहिती डॉ. येल तुंग चेन लाईव्ह ट्विट करून देत आहेत.
जगभरातील कोरोनाग्रस्तांना ज्या लक्षणांचा सामना करावा लागू शकतो, त्याबाबत जागरुकता पसरवणे हा यामागील उद्देश आहे.

या अनुभवाबाबत डॉ. येल तुंग चेन यांनी लिहिले आहे की, कोरोना व्हायरसची लागण झाल्याच्या चार दिवसानंतर प्रचंड खोकला आणि अशक्तपण जाणवू लागला. परंतु आता छातीमध्ये वेदना होत नाहीत.त्यांनी शेअर केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, पहिल्या दिवशी गळ्यामध्ये खवखव आणि डोकेदुखी जाणवत होती. परंतु फुफ्फुसाचे काम व्यवस्थित सुरू होते. चौथ्या दिवशी गळ्यातील खवखव आणि डोकेदुखी थांबली. मात्र खोकला सुरुच होता. तसेच फुफ्फुसामध्येही तरल पदार्थ जमा झाल्याचे ते म्हणाले. याचे फोटोही डॉ. येल तुंग चेन यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत.

डॉ. येल तुंग चेन यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृति वेगाने सुधारत आहे. ट्विटरवर माहिती देणे सुरू केल्यापासून जगभरातील नेटकऱ्यांकडून त्यांना तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा