पुणे : सध्या जगभरात कोरोना जगभरात व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. यावर राज्य सरकार, रूग्णालये, सामाजिक संस्था व संघटना या आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना अंमलात आणल्या जात आहे. त्यातच सध्या मोबाइलवर ऐकू येणारी कोरोना व्हायरसची माहिती देणारी कॉलरट्यूनमुळे ग्राहक वैतागले असल्याची माहिती आता समोर येऊ लागली आहे.सध्या सोशल मीडियावर कोरोनाच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी सरकारकडून लावण्यात आलेल्या कॉलरट्यूनची जोरदार चर्चा सुरू आहे. यात ऑडिओच्या सुरुवातीलाच येणारा खोकल्याचा आवाज ऐकल्यावर चिड आल्यासारखी होते. अशा प्रतिक्रिया लोकांमधून येऊ लागल्या आहेत. .
शिंक, खोकला यामुळे पसरणारे रोग हे खूप जास्त संसर्गजन्य असतात. त्यामुळे केंद्र सरकारने सुरू केलेला उपक्रम स्त्युत्य आहे. मात्र, ही कॉलरट्यून काढून टाकावी अशीही माहिती आता समोर येऊ लागली आहे. भारतासारख्या देशांत अशा आजारांबाबत या कॉलरट्यूनमुळे अधिक वेगाने जनजागृती होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
मोबाईल कंपन्या कॉलर ट्यून लावतात किंवा आपण सुद्धा कॉलर टोन सेट करू शकतो. पण सध्या प्रत्येकाच्या मोबाईलवर कॉलर ट्यून सेट असल्याने आपल्याला बदलण्याला वाव नाही. त्यामुळे आपल्याला योग्य बटन जर आपण लागले आणि सुरक्षित राहून झटपट कामे करू शकतो. त्यासाठी कॉल लावल्यानंतर हॅश बटन प्रेस करावे. यानंतर लागलीच आपला कॉल कनेक्ट होईल.
गेल्या काही दिवसांपासून प्रत्येकाच्या मोबाईलवर खोकल्याची कॉलर ट्यून ऐकायला मिळते आहे. यामुळे प्रत्येकजण वैतागला असेल पण काळजी करू नका, यावर उपाय सापडला असून कॉलर ट्यून वाजल्यास हॅश दाबून आपण कॉल उचलून न कोणत्याही अडथळ्याविना बोलू शकता.
त्यामुळे कोरोना संदर्भात माहिती देणारी ही ट्यून सध्या सर्व टेलिकॉम कंपन्यांनी मोबाइलवर जनजागृतीसाठी ऍक्टिव्ह केली आहे.