देशात कोरोना मुळे मृत्यू चा आकडा १००० च्या पुढे

मुंबई, २९ एप्रिल २०२०: देशात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सकारात्मक प्रकरणा बरोबरच मृत्यूचा आकडा देखील दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज भारतात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या १००० पार गेली आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. त्यात देशांमध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रात सकारात्मक प्रकरणे आढळून आले आहेत.

आज महाराष्ट्रात कोरोनामुळे संसर्गित रुग्णांची संख्या ९,३१८ वर पोचली आहे. आतापर्यंत राज्यात ४०० जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात मृत्यू दर बघितला तर तो ४.२९ इतका आहे. तसेच पूर्ण देशात ३१,३२३ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आणि देशभरात मृत्युच्या आकडा १००७ वर पोहोचला आहे.

महाराष्ट्रानंतर गुजरात मध्ये सर्वात जास्त सकरात्मक रुग्ण आहेत . गुजरात मध्ये आतापर्यंत ३७४४ प्रकरणे नोंदवले गेले आहेत. त्याचबरोबर दिल्लीमध्ये ३३१४, मध्य प्रदेश २३८७, राजस्थान २३६४, तमिळनाडू २०५८ आणि उत्तर प्रदेश २०५३ अशी प्रकरणे आढळून आले आहेत. आतापर्यंत जगभरामध्ये २९,५४,२२२ कोरोना संक्रमित प्रकरणे समोर आली आहेत. पूर्ण जगाच्या बाबतीत मृत्यूदर टक्केवारी मध्ये ६.८६ इतका आहे तर भारताच्या बाबतीत ३.२१ आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा