पुणे जिल्ह्याचा कोरोना संसर्गित आकडा चार हजाराच्या पुढे

पुणे, दि. १७ मे २०२०: विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे यांच्याकडून आज दि. १७ मे २०२० दुपारी ३ पर्यंतची कोरोना विषाणू (कोविड-१९) विषयी माहिती मिळाली आहे. पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ४००१ झाली आहे. त्यातील १९६० कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. पुण्यात अॅक्टीव रुग्ण संख्या १८४२ आहे.

▫️जिल्ह्यात १९९ मृत्यू,१५७ रुग्ण गंभीर:

पुणे जिल्हयात कोरोनाबाधीत एकुण १९९ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तसेच १५७ रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणा खाली आहेत. विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ४५९३ झाली आहे. विभागातील २२१८ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अॅक्टीव रुग्ण संख्या २१४६ आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण २२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १६८ रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.

कालच्या बाधीत रूग्णाच्या संख्येच्या तुलनेत बाधीत रूग्णाच्या संख्येमध्ये पुणे जिल्हयात २८१, सोलापूर जिल्हयात २५ ,कोल्हापूर जिल्हयात ७, सांगली जिल्हयात ६ व सातारा जिल्हयात ३ अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण ४९,०२७ नमूने तपासणीसाठी पाठविणेत आले होते त्यापैकी ४२,२९४ चा अहवाल प्राप्त आहे तर ६७३३ नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी ३७,८६६ नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून ४५९३ चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

▫️४,८१,१५,५२४ व्यक्तींची तपासणी:

आजपर्यंत विभागामधील १,१२,३२,२४४ घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत ४,८१,१५,५२४ व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी ३०५६ व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भात करण्यात आले आहे.

▫️परप्रांतीय व्यक्तीसाठी रेल्वेची सुविधा:

पुणे विभागातून दि. १७ मे पर्यंत मध्यप्रदेशासाठी – १५, उत्तरप्रदेशासाठी – २४ उत्तराखंडासाठी – १, तमिळनाडूसाठी -१, राजस्थानसाठी – ५, बिहारसाठी – ६ व हिमाचल प्रदेशसाठी १ अशा एकुण ५३ रेल्वे रवाना झालेल्या आहेत. यामधून ६८,५६३ प्रवासी रवाना करण्यात आलेले आहेत.
तसेच दि.१८ मे रोजी पुणे विभागातून मध्यप्रदेशसाठी १, उत्तरप्रदेशसाठी एकुण ३, तसेच तमिळनाडू, बिहार, झारखड, छत्तीसगड राज्यांसाठी प्रत्येकी १, अशा एकूण ८ रेल्वेगाडया नियोजीत असून यामध्ये एकुण १०,९५५ प्रवासी अपेक्षीत आहेत. यापैकी पुणे स्थानकावरुन उत्तरप्रदेश, तमिळनाडू, बिहार, झारखड व छत्तीसगड यांचेसाठी प्रत्येकी एक रेल्वे ६,९९४ प्रवाश्यासह नियोजित आहे. तर सांगली रेल्वेस्थानकावरुन मध्य प्रदेशसाठी १०५९ प्रवाश्यासह १ रेल्वेगाडी नियोजीत आहे. कोल्हापूर स्थानकावरुन उत्तरप्रदेशसाठी २९१२ प्रवाश्यासह २ रेल्वेगाडया नियोजीत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा