उरुळी कांचनमधील महिलेला कोरोनाची लागण

लोणी काळभोर:  एका मोठ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये एक ४७ वर्षीय महिला कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. ही महिला उरुळी कांचन येथील (ता. हवेली)रहिवासी असून,अंगात ताप असल्यामुळे गुरुवारी (ता. १६ ) दुपारी रुग्णालयात दाखल झाली होती. शुक्रवारी दुपारी कोरोना चाचणी केली असता ती कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले व त्या महिलेला पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते व तिची टेस्ट केली असता ति महिला पॉझिटिव्ह आढळून आली,आशी माहिती प्रशासनाने दिली आहे .

या दरम्यान पूर्व हवेलीत हा पहिलाच कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. यामुळे उरुळी कांचन व लोणी काळभोर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे व सरपंच सौ. गौरीताई चित्तरंजन गायकवाड व भाजपा नेते चित्तरंजन गायकवाड, ग्रामपंचायत कदम वाकवस्ती ग्रामसेवक प्रविण देसाई, यांनी नागरिकांना घाबरून जाऊ नका असे कळकळीचे आवाहन केले.

डॉक्टररांशी चर्चा केली आहे तरी सर्वांनी काळजी घ्या आणि घरीच रहा आणि डॉक्टरांनी सांगितले की घरी रहा सुरक्षित रहा. नागरिकांनी भिऊन न जाता घरी सुरक्षित रहा बाहेर येवू नका.
ग्रामपंचायत राञीचा दिवस करेल पण कोरोनाला हरवेल .तुम्ही नागरीकांनी फक्त साथ देऊन घरात बसा असे आवाहन कदमवाकवस्ती च्या सरपंच गौरीताई गायकवाड यांनी केले आहे व हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलच्या आजू बाजूला पुर्ण सैनिटाइजर करून सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला

मा. व्यवस्थापक सो विश्वराज सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल , कदमवाकवस्ती , ता . हवेली, जि. पुणे. कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखणे करिता असलेल्या उपाय ( कोरोना पॉझीटिव्ह रुग्णाच्या सहवासीतांचे थ्रॉट स्क्रिनिंग, विलगीकरण करणे व हॉस्पिटलमधील कदमवाकवस्ती व लोणीकाळभोर भागातील सर्व डॉक्टर्स, नर्स व कर्मचारी यांची माहिती मिळणे बाबत ) महोदय, उपरोक्त विषयास अनुसरुन आपणांस कळविणेत येते कि, मौजे कदमवाकवस्ती, ग्रामपंचायत क्षेत्रात कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी उपाय योजनेचा एक भाग म्हणुन आपण आपल्या हॉस्पिटमध्ये आढळून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या सहवासीतांचे सर्व हॉस्पिटल स्टाफ यांचे विलगीकरण लवकरात लवकर करणेत यावे, त्यांचे शॉट स्वब लॅबसाठी पाठविण्यात यावेत, कम्युनिटी ट्रान्समिशन रोखण्यासाठी त्वरीत उपाय योजना करणेत यावी व रिपोर्ट तात्काळ पाठविणेत यावे. तसेच कदमवाकवस्ती व लोणीकाळभोर हद्दीमध्ये सर्व डॉक्टर्स, नर्स व सर्व कर्मचारी यांची नावे, पत्ता, मोबाईल क्रमांकाची त्वरीत माहिती देणेत यावी. कोणाचीही माहिती शिल्लक ठेवणेत येऊ नये. अन्यथा आपल्यावर योग्य ती कारवाई करणेत येईल.

सदर माहिती ग्रामपंचायतीला पाठविणेत यावी . तरी कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव नियंत्रणा बाबत सहकार्य व्हावे . अशी विनंती भाजपा नेते चित्तरंजन गायकवाड यांनी विनंती केली व त्यांना तात्काळ होम क्वारंटाइन करण्यात येईल असे ते बोलत होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा