बारामती , १ सप्टेंबर २०२० : दरवर्षी अनंत चतुर्थीला शहरात गणपतीची मिरवणूक मंडळे वाजत गाजत तसेच पारंपरिक वाद्याच्या गजरात जयघोष करत काढतात मात्र सध्या कोरोना संसर्गामुळे शासनाच्या नियमाप्रमाणे जमावबंदी कायद्याप्रमाणे गर्दी करू नये यासाठी मिरवणुकीला परवानगी नसल्याने आज अनंत चतुर्थी दिवशी रस्ते ओस पडले होते.
शहरात दरवर्षी अनंत चतुर्थीला शहरात वाजत गाजत निघणाऱ्या मिरवणुकीवर यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासनाने गर्दी न करण्याचे आदेश दिले असल्याने आज शहरातील मानाच्या गणेश मंडळ ढोल ताशा ,लेझीम ,पारंपरिक वाद्य वाजवत जयघोष करत तसेच सुंदर आरास करून शहरातून मिरवणूक काढण्यात येते मात्र आज मिरवणुकीसाठी परवानगी नसल्याने आज शहरात साध्या पद्धतीने विसर्जन करण्यात आले सकाळ पासून घरगुती गणपतींचे विसर्जन कुंडात करण्यात आले तर नीरा डावा कालव्याचे सुशोभीकरणाचे काम सुरू असल्याने पालिका प्रशासनाने यावर्षी शहरातील तीन भागात दरवर्षी पेक्षा वाढवून २६ कुंड ठेवले होते. यामुळे कुठे गर्दी झाल्याचे चित्र नव्हते सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री शेवटच्या गणपतीचे विसर्जन होई पर्यंत पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.तर पालिकेचे दहा फिरते रथ कुंडात जमा झालेल्या मूर्ती घेऊन जाण्यासाठी सज्ज होते. यावेळी जमा झालेले सर्व निर्माल्य बारामती कृषी उत्पन्न समितीच्या गांडूळ खतासाठी दिले आहे. तर शहरातली सर्व मोठ्या गणेश विसर्जन मिरवणूका न काढता साध्या पद्धतीने गणेश विसर्जन केले तर अनेक घरगुती गणपतीचे घरीच भांड्यात विसर्जन करण्यात आले.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदा गणेश विसर्जन मिरवणुकीला परवानगी नसल्याने बारामतीतील नागरिकांनी तसेच गणेश मंडळांनी सहकार्य करत शासनाच्या नियमांचे पालन करत शांततेत विसर्जन केल्याने बारामती शहर पोलीस स्टेशन आभारी आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी