पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव

राजगुरूनगर, दि. २९ एप्रिल २०२० : पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड मध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढत होत आहे. प्रशासन प्रयत्न करीत आहे, मात्र त्या रुग्णांच्या संपर्कात येणा-या प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता आहे. पुणे शहरात एका आधिका-याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर त्या अधिकाऱ्याच्या रोज संपर्कात असणाऱ्या खेड तालुक्यातील एका व्यक्तीला औंध येथील रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील खेड तालुक्यातील तिन्हेवाडी येथील संबंधित संशयित व्यक्ती ही पुणे शहरात नोकरी निमित्त रोज येणे – जाणे करीत आहे. तो काम करीत असलेल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्यास, मंगळवारी कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या नियमितपणे संपर्कात असलेल्यांमध्ये तिन्हेवाडी मधील व्यक्तीला आरोग्य विभागाने ताब्यात घेतले आहे. त्या संशयित या व्यक्तीच्या कुटुंबातील संपर्क झालेल्या सर्व व्यक्तींना स्थानिक प्राथमिक शाळेत विलीगिकरण कक्षात ठेवण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.

ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राजगुरुनगर व परिसरात लॉकडाऊन कडक करण्यात आले आहे. पोलीस, आरोग्य विभाग, महसूल विभाग, पंचायत समिती व प्रशासन दिवसरात्र मेहनत घेत आहे. मात्र नागरिकांना कोरोनाचे गांभिर्यच राहिले नसुन, नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर येत आहेत. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी कोरोनावर मात करण्यासाठी, स्वतःहून घरात राहून प्रशासनाला सहकार्य करत कोरोनाची ही लढाई जिंकण्यासाठी मदत करण्याचे आवाहन खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांनी केले आहे.

अनकट न्यूज प्रतिनिधी -सुनिल थिगळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा