नवी दिल्ली, २४ सप्टेंबर २०२० : कोरोना साथीच्या आजारामुळं जगभरातील आर्थिक घडामोडींवर परिणाम झालाय. ज्यामुळं रोजगाराच्या संधी कमी झाल्या आहेत. लॉकडाऊनमुळं मोठ्या संख्येनं लोक बेरोजगार झाले आहेत. आता संयुक्त राष्ट्र संघटना आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं (आयएलओ) एक अहवाल प्रसिद्ध केलाय.
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालात असं म्हटलं आहे की जगभरात कोरोना साथीमुळं ५० कोटीहून अधिक लोक बेरोजगार झाले आहेत. आयएलओनं कामाचा तास कमी होण्याच्या आधारे हा अंदाज लावला आहे.
अपेक्षेपेक्षा जास्त बेरोजगारीचे आकडे
आयएलओनं आपल्या अहवालात दावा केलाय की, कोरोनामुळं रोजगाराच्या मोर्चावरील मूल्यांकनामुळं अधिकाधिक लोक प्रभावित झाले आहेत. या वर्षाच्या अखेरीस रोजगारामध्ये सुधारणा होण्याची शक्यता देखील कमी आहे. कारण, अर्थव्यवस्था सुधारण्याचा वेगही कमी आहे.
कामाचे तास कमी होण्याच्या आधारे बेरोजगारीच्या ५० कोटी आकडेवारीचा अंदाज लावला जात आहे. अहवालानुसार, वित्तीय वर्ष २०१९-२० च्या तुलनेत या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जगातील कामाचे तास १७ टक्क्यांनी घसरले आहेत, जे ५० कोटी लोकांच्या नोकर्या गमावण्यासारखं आहे.
कामाच्या तासांवर आधारित अंदाज
जूनच्या सुरुवातीला, आयएलओच्या अहवालात असा अंदाज केला गेला होता की, कोरोनाच्या संकटामुळं ४० कोटी लोक बेरोजगार होतील. कामकाजाच्या आधारावर अहवालात म्हटलं आहे की, कोरोनामुळं १० कोटीहूनही अधिक लोक बेरोजगार झाले आहेत.
आयएलओचे अध्यक्ष गाय रायडर म्हणतात की, कामगार बाजाराचे नुकसान भयंकर आहे. जागतिक स्तरावर कामगार उत्पन्नात १०.७% घट झालीय. इतकंच नव्हे तर कोरोना विषाणूची दुसरी लाट आली तर परिस्थिती आणखी बिकट होईल, अशी भीती आयएलओनं व्यक्त केलीय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे