भारतात कोरोनाचा सामूहिक संसर्ग, तर राज्याची परिस्थिती बिकट….

नवी दिल्ली, दि. २० जुलै २०२०: भारतातील कोरोना रुग्णांची संख्या १० लाख पार गेली असून, आता कोरोनाच्या सामूहिक संसर्गालाही सुरुवात झाली आहे.असे इंडियन मेडिकल असोसिएशनचा (आयएमए) एक विभाग असलेल्या हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे प्रमुख डॉ. व्ही. के. मोंगा यांनी म्हटले आहे. त्यामुळे परिस्थिती बिकट बनली आहे. त्यांनी पुढे सांगितले की सध्या देशात दररोज कोरोनाचे ३० हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळत असून कोरोनाचा फैलाव ग्रामीण भागातही होत आहे ते चांगले चिन्हं नाही.

शहरांच्या तुलनेत गावांमध्ये बाधितांचे प्रमाण वाढत आहे. तिथे कोरोना साथीच्या फैलावावर नियंत्रण मिळविणे अवघड झाले आहे. दिल्लीमध्ये कोरोनाच्या साथीवर नियंत्रण मिळवले असले, तरी महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा, मध्य प्रदेश या राज्यांतील ग्रामीण भागात तसे यश मिळालेले नाही. त्या राज्यांनी तातडीने अधिक प्रभावी उपाय योजावेत त्यासाठी केंद्र सरकारची मदत घ्यावी. यासाठी प्रतिबंधक लस प्रत्येकाला टोचणे हा एक चांगला उपाय आहे. असे डॉ. मोंगा म्हणाले.

राज्याची परिस्थिती बिकट:

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिवसभरात आढळून आलेल्या करोना बाधित रुग्णांची आकडेवारी ट्विट केली आहे. राज्यात काल ९,५१८ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे.त्यामुळे एकूण संख्या आता ३,१०,४५५ इतकी झाली आहे.आज ३,९०६ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण १,६९,५६९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्यातील कोरोना संकट हे आणखी गडद होत असून नागरिकांची चिंता वाढावी अशीच आकडेवारी आज समोर आली आहे. राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून पहिल्यांदाच दिवसभरात इतक्या मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या ३,१०,४५५ इतकी झाली आहे. राज्यात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १,२८,७३० इतकी आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा