“या” औषधाने लवकर बरे होत आहेत कोरोना रुग्ण…..

नवी दिल्ली, दि.२३ जुलै २०२० : ग्लेनमार्कने फेव्हिपिराविर हे औषध हलके व मध्यम लक्षण असणाऱ्या कोरोना रुग्णांना लवकर बरे करते असा दावा कंपनीने केला आहे. ही माहिती फार्मा कंपनीने आपल्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलचे परिणाम जाहीर करताना दिली आहे.

कंपनीने म्हटले की, तिसऱ्या टप्प्यातील चाचणीमध्ये एकूण लोकसंख्येच्या २८.६ टक्के वेगाने बरे होण्याचा दर आहे. अन्य रुग्णांच्या तुलनेत फेव्हिपिराविरने रुग्ण लवकर बरे झाले आहेत. या औषधाने कोव्हिड-१९ चे ४० टक्के रुग्ण वेगाने रिकव्हर झाले. त्यांचे तापमान, ऑक्सिजन सॅच्यूरेशन, श्वसन दर आणि खोकला क्लिनिकल ट्रायलमध्ये सरासरी वेळेत कमी झाले.

फेव्हिपिराविर एक अँटीव्हायरल औषध आहे. या औषधाचे भारतातील ७ क्लिनिकल साइट्सवर १५० हलक्या व मध्यम कोरोनाग्रस्तांवर याचे ट्रायल करण्यात आले. ग्लेनमार्कच्या क्लिनिकल डेव्हलपमेंटच्या प्रमुख आणि उपाध्यक्ष मोनिका टंडन म्हणाल्या की, या परिणामांनी आम्हाला प्रोत्साहन दिले आहे.

यातून संकेत मिळतो की फेव्हिपिराविरच्या सुरूवातीच्या उपचाराने हलक्या व मध्यम रुग्णांच्या क्लिनिकल परिणामांमध्ये सुधारणा होऊ शकते. हे रुग्णांचे तीव्र श्वसन सिंड्रोम आणि मृत्यू दर कमी करू शकते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा