कोरोना रुग्णनांना देखील मतदानाचा अधिकार बजावता येणार

बारामती १४ जानेवारी २०२१ : बारामती तालुक्यात उद्या शुक्रवार दि.१५ रोजी ग्रामपंचायत निवडणुक होत असून तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या साधारण ऐंशी आहे.मात्र त्यांना स्वइच्छेने मतदान करायचे असेल तर कोरोना रुग्णांनी मतदानाच्या शेवटच्या वेळात मतदान करायचे आहे.मतदान केंद्रावर कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्व खबरदारी घेतल्या असोयाचे तहसीलदार विजय पाटील यांनी सांगितले.
तालुक्यात होणाऱ्या निवडणुकीच्या धर्तीवर कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत मतदान केंद्राच्या ठिकाणी नेमून दिलेले क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य अधिकारी,आरोग्य कर्मचारी,स्त्री,पुरुष,आशा वर्कर्स या येणाऱ्या सर्व मतदारांचे ऑक्सिजन व तापमान तपासणी केली जाणार असुन मतदारांना मास्क लावणे बंधनकारक आहे.
शासनाच्या नियमाप्रमाणे सोशल डिस्टन्स असणार आहे.मतदाराला ताप, सर्दी,खोकला असेल तर त्यांना व कोरोना बाधीत रुग्णांना व होम कोरोन्टीन केलेल्यांना मतदानाच्या शेवटच्या वेळात मतदान करता येणार आहे.मतदानाच्या दिवशी मतदानाच्या आधी व नंतर सॅनिटायजर फवारणी करण्याचे ग्रामपंचायतीला आदेश दिले असुन मतदान केंद्रावर हात धुण्याची सोय केली असल्याचे निवडणूक अधिकारी राहुल काळभोर यांनी सांगितले.तसेच नऊ वैद्यकीय अधिकारी व १६३ कर्मचारी नेमले आहेत.कोरोना रुग्णाला मतदान करायचे असेल तर त्याला आम्ही रुग्णवाहिकेत आणणार आहे.तर मतदानकेंद्रावर सोशल डिस्टन्स, सॅनिटायजर, मास्क वापरणे यावर हलगर्जीपणा आढळल्यास क्षेत्रीय अधिकारी निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार करतील.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा