पुरंदर, दि. २९ जून २०२०: पुरंदर तालुक्यातून पंढरपूरकडे आषाढीवारीसाठी जाणाऱ्या संत चांगवटेश्वर यांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची कोरना टेस्ट केली असता यातील वारकऱ्यांच्या यादीतील दोन वारकऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठी खळबळ माजली आहे.
दरवर्षी सासवड मधून संत सोपनकाका व संत चांगवटेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जात असतो. हाजरो वारकरी या वारी सोहळ्यामध्ये पायी चालत असतात. यावर्षी हा सोहळा होणार नसला तरी आषाढी एकादशीला संतांच्या पादुका विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला जाणार आहेत यावेळी या पादुकांबरोबर निवडक लोक असणार आहेत. त्यामध्ये २० लोकांची अट शासनाने घालून दिलेली आहे. हे सर्व लोक एकत्र आल्यावर कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो व राज्यभर कोरोनाचा फैलाव होऊ शकतो.
त्यामुळे शासनाने ठोस निर्णय घेत पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी पादुकांचे बरोबर असलेल्या या २० लोकांची कोरोना टेस्ट घेण्याची ठरवले. सासवड येथील कोविड सेंटरमध्ये या लोकांचे स्वॅप घेऊन चाचणी करण्यात आली. यावेळी संत सोपनकाका पालखी सोहळ्यातील सर्व वारकऱ्यांचे करून अहवाल निगेटिव्ह आले.
मात्र चांगवटेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील संभाव्य वारकऱ्यांन पैकी दोघा जणांचे अहवाल पॉझिटिव आले. शासनाने वेळीच दखल घेत कोरोना टेस्ट केल्यामुळे या दोघांना वारीत जाण्यापासून रोखता आले. त्यातील एक वारकरी पुरंदर तालुक्यातील खळद येथील असून दुसरा वारकरी पनवेल येथील आहे.
वेळीच करोना टेस्ट केल्यामुळे कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यात प्रशासनाला मोठे यश आले आहे. याबद्दल पुरंदर प्रशासनाचे लोकांकडून कौतुक करण्यात येत आहे. दिनांक 30 जून रोजी या दोन्ही ही संतांच्या पादुका विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहेत. यावर्षी या पादुका एसटी बसने नेण्यात येणार आहेत यावेळी प्रत्येक पादुकां बरोबर केवळ वीस लोकांनाच प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे