देशातील ७० जिल्ह्यांमध्ये दीडशे टक्क्यांनी वाढला कोरोना, पंतप्रधानांनी दिले सतर्कतेचे आदेश

नवी दिल्ली, १८ मार्च २०२१: कोरोना संसर्गाचा धोका पुन्हा एकदा देशात आपले डोके वर काढताना दिसत आहे. या गोष्टीकडे गांभीर्याने पाहत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन पुढील रणनीतीवर चर्चा केली. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, जर कोरोना च्या दुसऱ्या लाटेला रोखण्यास आपण असमर्थ राहिलो तर याचे परिणाम गंभीर होतील. देशभरातून आलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्र, पंजाब आणि केरळ यांसारख्या राज्यांमधून कोरोना ची सर्वाधिक प्रकरणे समोर येत आहेत. याशिवाय गुजरात, मध्यप्रदेश आणि दिल्ली यांसारख्या राज्यांमध्ये देखील प्रकरणे वाढताना दिसत आहे. देशभरातील ७० जिल्ह्यांमध्ये कोरोना प्रकरणे १५० टक्क्यांहून अधिक वाढले आहेत.

यादरम्यान देशात लसीकरणाची मोहीम देखील जोरात सुरू आहे. लसीकरण सुरू झाल्यानंतर ६१ व्या दिवशी म्हणजेच बुधवारी १४.०३ लाख लोकांना लस टोचण्यात आली आहे. आतापर्यंत देशभरात एकूण ३.६४ कोटींपेक्षा जास्त लोकांना लस टोचली गेली आहे.

महाराष्ट्रात २३,१७९ नवीन प्रकरणे तर ८४ मृत्यू

राज्यात मागील दिवसाच्या तुलनेत सध्या दुपटीने कोरोना प्रकरणे समोर येत आहेत. सध्याच्या क्षणी देशातील एकूण प्रकरणांपैकी ६० टक्के प्रकरणे केवळ राज्यात आले आहेत. कोरोना मुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी ४५ टक्के प्रकरणे राज्यातून समोर येत आहे. ही स्थिती पाहता राज्यातील अनेक भागांमध्ये अंशतः किंवा पूर्ण लॉक डाऊन लावण्यात आले आहे.

बुधवारी मुंबईमध्ये २३७७ नवीन प्रकरणे समोर आली आहेत तर आठ जणांचा मृत्यू देखील झाला आहे. त्याचबरोबर संपूर्ण राज्यात बुधवारी रेकॉर्ड २३,१७० नवीन प्रकरणे समोर आली आहेत. तर राज्यात ८४ लोकांचा मृत्यूदेखील झाला आहे. राज्यात सध्या कोरोना मृत्युदर २.२४ टक्के आहे.

नागपूर मध्ये दुपारी एक नंतर दुकाने राहणार बंद

नागपूर मध्ये २१ मार्च पर्यंत लॉक डाऊन लावण्यात आले आहे.मात्र, याचा कोणताही परिणाम होताना दिसत नाही. लॉक डाऊन विफल होत असताना पाहून प्रशासनाने निर्णय घेतला आहे की, दुपारी एक वाजे नंतर भाज्यांची दुकाने, राशन सहित दैनंदिन आवश्यक असलेल्या वस्तूंची सर्व दुकाने बंद ठेवले आहेत. फक्त औषधांची दुकाने सुरू राहणार आहेत. नागपूर मध्ये गेल्या २४ तासात २६९२ नवीन प्रकरणे समोर आली आहेत तर १८ लोकांचा मृत्यू देखील झाला आहे. या नंतर पुण्यात २६१२ नवीन प्रकरणे समोर आली आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा