राज्यात कोरोना परिस्थिती हाताबाहेर, राज ठाकरेंवर पोलिसात तक्रार…….

8

मुंबई, ८ मार्च २०२१: राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला आहे.ज्यामुळे राज्याची कोरोना स्थिती ही आणखी बिकट झाली आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस नवीन कोरोना रूग्णांचा आकडा वाढत असुन सरकार समोर येत्या दिवसात कठोर पाऊले उचलण्या अखेरीस पर्याय नसावा. त्यामुळे नागरिकांनी वेळीच सावध आणि सतर्कतेने राहणे गरजेचं आहे.

महाराष्ट्रात रविवारी कोरोनाचा चांगलाच उद्रेक पहायला मिळाला. रविवारी राज्यात ११,१४१ नवे कोरोना रूग्ण आढळले तर ३८ जणांना या विषाणु मुळे आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या २२,१९,७२७ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत ५२,४७८ रूग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. तसेच राज्यातील २०,६८,०४४ रूग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केलीये. तर सध्या ९७,९८३ रूग्ण ॲक्टीव्ह आहेत.

राज ठाकरेंच्या आवाहानामुळे कोरोना वाढला; पोलिसात तक्रार…..

एकीकडे दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मास्क न घालण्याचा आवाहनामुळे राज्यात कोरोना वाढला असं म्हणत ॲड. रत्नाकर चौरे यांनी पोलिसात तक्रार केली. औरंगाबादच्या क्रांतीचौक पोलिस ठाण्यात ही तक्रार त्यांनी केली आहे.

मध्यतंरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक दौर्यावर होते. तिथे ही त्यांनी मास्क लावला नव्हता. दरम्यान ते प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले होते मी मास्क घालत नाही आणि नाशिकच्या दौर्यावर माजी महापौर आशोक मुर्तडक यांना ही मास्क काढायला त्यांनी सांगितले होते.असे चौरे यांनी स्पष्ट केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा