राज्यातील कोरोना स्थिती,कोणत्या ठिकाणी लागलेत निर्बंध

10
पुणे  १० मार्च २०२१; राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.ज्यामुळे राज्यातील विविध भागात लाॅकडाऊन लावण्यात आले आहे.तर जिथ परिस्थिती बिकट आहे तिथे संचारबंदी, कडक जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे.९ तारखेला ठाण्यातील १६ ठिकाणी लाॅकडाऊन करण्यात आला तर त्या पाठोपाठ जळगाव मधे देखील तीन दिवस कडक जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे.
८ मार्चला राज्यात ८,७४४ कोरोना रूग्ण आढळले आहे.९ तारखेला ९,९२७ कोरोना रूग्ण आढळले आहेत तर ५६ जणांचा मृत्यू झाला आहे.या नव्या आकडेवारी नुसार राज्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या २२,३८,३९८ इतकी झाली आहे.आतापर्यंत ५२,५५६ जणांचा कोरोना विषाणुमुळे मृत्यू झाला आहे.ॲक्टीव्ह रूग्णांची संख्या ही ९०,३२२ आसून ९ तारखेला  १२,१८२ जणं कोरोनामुक्त झाले आहेत.
पाहूयात कुठे निर्बंध…..
जळगाव मधे ११ मार्चपासून संध्याकाळी ८ वाजल्यापासून सकाळी १५ मार्चच्या सकाळी ८ तारखेपर्यंत कडक जनता कर्फ्यू.
सिंधुदुर्ग-देवगडचे कुणकेश्वर मंदिर १० ते १४ मार्च पर्यंत बंद.
नाशिक मधे १५ मार्चनंतर सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी.
अहमदनगर मधे लग्नात पोलीस हजर राहणार,नियम मोडल्यास दंड होणार.
ठाण्यात १६ हाॅटस्पाॅट ठिकाणी ३१ मार्च पर्यंत कडक निर्बंध.
बुलडाण्यात १६ मार्चपर्यंत टाळेबंदी कायम.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव.