करोना चाचणीचे दर आणखी २०० रुपयांनी कमी, करोना चाचणी आता ९८० रुपयांत

मुंबई, २७ ऑक्टोबर २०२०: करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संशयितांच्या जास्तीत जास्त चाचण्या व्हाव्यात यासाठी खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचणीचे दर आणखी २०० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी ९८०, १४०० आणि १८०० रुपये असा कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाही. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिली.

यानुसार कोविड केअर सेंटर्स, हॉस्पिटल, क्लिनिक, क्वॉरंटाईन सेंटर्समध्ये स्वॅब दिल्यास १४०० रुपये आकारले जाणार आहेत. तर घरी येऊन स्वॅब घेतल्यास १८०० रुपये आकारले जाणार आहेत. या नव्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आला असून त्याची राज्यभरात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती टोपे यांनी दिली.

राज्यात कोरोना नियंत्रणासाठी चाचण्यांवर भर देण्यात असून प्रती दहा लाख लोकसंख्येमागे ७० हजार चाचण्या केल्या जात असून त्या वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. जेणेकरुन कोरोनावर अधिक नियंत्रण मिळविता येईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा