भारतातील आणि राज्यातील कोरोना आपडेट……

7

मुंबई, दि. २७ जुलै २०२०: भारतातील कोरोनाचा उद्रेक वाढत असून,देशात कोरोना रुग्णांची संख्या हि १४ लाखाच्या पार गेली आहे.ज्यामध्ये सध्या ४ लाख ७७ हजार २२८ रुग्ण हे अॅक्टीव्ह आहेत. तर ९ लाख १ हजार ९५९ रुग्ण हे सुखरुपपणे कोरोनावर मात करुन घरी पोहचले आहेत.देेशातील एकुण रुग्ण संख्या हि १४ लाख ११ हजार ९५४ इतकी झाली असून ३१ हजार ३५० रुग्ण हे कोरोनाचे बळी ठरले आहेत.भारत जागतिक क्रमवारीत ३ रा स्थानी आहे.तर ब्राझील २ रा ब्राझील आणि अमेरिका १ला देश आहे.

राज्यातील कोरोनाची स्थिती……

राज्यात गेल्या २४ तासात ९४३१ नवे रुग्ण आढळले असून,आज ६०४४ रुग्ण हे बरे होऊन घरी गेले तर आज २६७ मृत्यूची नोंद झाली आहे.त्या बरोबरच आता राज्यात एकुण २ लाख १३ हजार २३८ लोकांनी यशस्वी मात केली आहे.तर राज्याचा रिकव्हरी रेट हा ५६.७४ % झाला असून १ लाख ४८ हजार ६०१ अॅक्टिव्ह रुग्णांवर सध्या उपचार सुरु असून आत्तापर्यंत राज्यात १३ हजार ६५३ मुत्यूची नोंद झाली आसून राज्याचा मुत्यूदर हा ३.६३ असल्याची माहीती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.


न्यूज अनकट प्रतिनिधी