मॉस्को, ३० जुलै २०२०: कोरोना महामारीमुळे जगभरात मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि जिवीतहानी झाली आहे. कोट्यावधी लोकांना याचा संसर्ग झाला असून आत्तापर्यंत ६ लाखाहून अधिक रुग्ण या महामारीचे बळी ठरले आहे. कोरोनावर लस तयार करण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत आहेत. तर त्यापैकी काही चाचण्या अंतिम टप्प्यात देखील पोहचल्या आहेत.
CNN वृत्त वाहिनीला दिलेल्या माहितीनुसार रशियातील शास्त्रज्ञ १० ऑगस्ट रोजी किंवा त्यापूर्वी लस मंजूर करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करीत आहेत. रशियाची ही लस मॉस्कोच्या गमालय इन्स्टिट्यूटने विकसित केली आहे. रशियाकडून या लसीबद्दलची एक चांगली बातमी आहे. हा देश लवकरच लस वापरण्यास मान्यता देऊ शकेल.
माकडांवर लसीचे परीक्षण निकाल न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झाले आहेत. या संशोधनात सामील झालेल्या आठ माकडांना तीन गटात विभागले गेले आणि १० किंवा १०० मायक्रोग्रामची दोन इंजेक्शन्स दिली. संशोधकांनी सांगितले की ही लस मिळाल्यानंतर माकडांमध्ये सार्स-कोव-२ वर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात अँटीबॉडी तयार करण्यात आल्या.
अहवालानुसार, पहिल्यांदा ही लस आरोग्य कर्मचार्यांना दिली जाईल,त्यांचा विश्वास आहे की यामुळे कोरोना विषाणूची लागण कमी होऊ शकते आणि कोरोनाविरूद्ध लढणार्या योध्यांना बळकटी मिळेल. लस चाचणीच्या संबंधित कोणतीही माहिती रशियाने अधिकृतपणे सांगितली नाही. त्यामुळे लस किती प्रभावी असेल हे या क्षणी सांगणे कठीण आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की बाजारात लस लवकर उपलब्ध करुन देण्यासाठी राजकीय दबाव आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी