कोरोना लस यशस्वी, लवकरच सर्वसामान्यांवर होणार चाचणी, या देशाने मारली बाजी…

रशिया, दि. १३ जुलै २०२०: कोरोना लसीच्या शर्यतीत जगभरात संशोधन चालू असून अनेक देश यामधे आघाडीवर असल्याचे चित्र आहे. मात्र मानव जातीची कोरोना परिक्षा संपली असे म्हणायला सध्या हरकत नाही. हे विधान करण्याचे कारण रशियाने सर्वसंपन्न अशी कोरोनावरील लस तयार केली असल्याचा दावा केला आहे. रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने करोना व्हायरसवर लस बनवली आहे. सेचेनोव्ह विद्यापीठाने स्वयंसेवकांवरील या लसीच्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्याचे म्हटले आहे.

चाचणी परीक्षणात ही लस यशस्वी ठरल्याचा विद्यापीठाचा दावा आहे. स्वयंसेवकांच्या पहिल्या गटाला बुधवारी डिस्चार्ज देण्यात येईल. दुसऱ्या गटाला २० जुलैला डिस्चार्ज देण्यात येणार आहे असे वादिम तारासोव्ह यांनी सांगितले. ते इंस्टिट्यूट फॉर ट्रान्सलेशनल मेडिसिन अँड बायोटेक्नॉलॉजीचे संचालक आहेत.

“रशियाच्या गेमली इंस्टिट्यूट ऑफ अ‍ॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने तयार केलेल्या या लसीच्या क्लिनिकल चाचण्या सेचेनोव्ह विद्यापीठाने १८ जून रोजीच सुरु केल्या होत्या. करोना व्हायरसविरोधात बनवण्यात आलेल्या जगातील पहिल्या लसीच्या स्वयंसेवकांवरील चाचण्या सेचेनोव्ह विद्यापीठाने यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत” असे तारासोव्ह यांनी सांगितले.

त्यामुळे जगभरात हाहा:कार आणि कहर केलेल्या कोरोनाचा अंत आता जवळ आला आहे हे मात्र नक्की आहे. तसेच जगभरातील या संशोधनात रशियाची हि लस जर यशस्वी रित्या बाहेर पडली आणि रशियाचा दावा खरा ठरला तर रशिया हा लस विकसित करणारा पहिला देश म्हणून मानाचा तुरा डोक्यात रोवेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा