पुणे, ३ फेब्रुवरी २०२१: कोरोना महामारीमुळे मानवजातीचे अनेक नुकसान झाले. तर या विषाणुमुळे आणखी एक माहिती पुढे आली आहे. ज्यामधे कोरोना व्हायरस मुळे पुरूषांच्या शुक्राणूला किती नुकसान पोहचू शकते. याबद्दल जाणून घेणार आहोत.
स्टडी
रिप्राॅडक्शन या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अवाहलानुसार कोरोना व्हायरस पुरुषांमध्ये शुक्राणू पेशींचा मृत्यू, जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव वाढण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो.
विश्लेषण
या अभ्यासादरम्यान ६० दिवसांसाठी १० दिवसांचे अंतर ठेवून कोरोनाचा संसर्ग झालेल्या ८४ पुरूषांच्या डेटाची तुलना १०५ निरोगी पुरूषांच्या डेटाशी करण्यात आली.
कोरोनाची लागण झालेल्या पुरूषांच्या शुक्राणू पेशी मधे जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव वाढलेला दिसून आला. हे एक केमिकल असंतुलन आहे, ज्यामुळे डिएनए आणि शरीरातील प्राॅटिन्सचे नुकसान होऊ शकते.
नुकताच समोर आलेला अहवाल…
नुकत्याच समोर आलेल्या अभ्यास अहवालात असे दिसून आले की, कोरोना झाल्यामुळे पुरूषांच्या रिप्रोडेक्टिव्ह अवयवांना संसर्ग होण्याची शक्यता असते, यामुळे शुक्राणु विकसित होण्यात बिघाड होऊ शकतो आणि रिप्रोडेक्टिव्ह हार्मोन्स ला अडथळा निर्माण केला जाऊ शकतो.
तज्ञ काय म्हणतात….
सध्या जो अभ्यास अहवाल समोर आला आहे. त्यामधे आणखी संशोधनाची गरज आहे, असे तज्ञ म्हणतात. तसेच ज्यांना कोरोना झाला, त्यांना बरे वाटत नसेल आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आसेल, परिणामी शुक्राणूंची संख्या कमी झाली असेल, असे तज्ञांनी म्हटलं आहे.
शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी काही टिप्स…..
अति वजन वाढू देऊ नका.
धुम्रपान करू नका व मद्यपान टाळा.
घट्ट अंडरवेअर घालू नका, कारण यामुळे जननेंद्रियाच्या भागात योग्य रक्तभिसारण होण्यावर परिणाम होतो.
जननेंद्रिया जवळ मोबाईल, लॅपटॉप ठेवणे टाळा, कारण यामुळे रेडियशनचा धोका होऊ शकतो.
पोष्टीक आहार घ्या व निरोगी प्रतिकात्मक शक्ती वाढवण्यासाठी नियमित व्यायाम करा.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव