पुणे, १८ सप्टेंबर २०२०: चीनी व्हायरॉलॉजिस्ट डॉ. ली-मेंग यान यांनी असा दावा केलाय की कोरोनाव्हायरस (कोविड -१९) वुहानमधील शासकीय नियंत्रित प्रयोगशाळेत तयार केला गेलाय आणि या दाव्याचं समर्थन करण्यासाठी त्यांच्याकडं शास्त्रीय पुरावे असल्याचं त्यांनी प्रतिपादन केलं आहे.
चीनी सरकारविरूद्ध व्हिसल ब्लोअर बनलेल्या या विषाणूतज्ञाला गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात चीनमध्ये सार्स विषाणूशी निगडीत जी प्रकरणं समोर येण्यास सुरुवात झाली होती त्यांना हाताळण्याचं काम सोपवण्यात आलं होतं. हाँगकाँगमध्ये काम करणाऱ्या शीर्ष वैज्ञानिकांनी असा दावा केलाय की, या व्हायरॉलॉजिस्ट डॉ. ली-मेंग यान यांना तपासणी दरम्यान एक गुप्त मोहीम निदर्शनास आली. यानुसार या विषाणूचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होण्यापूर्वीच चिनी सरकारला या विषयी सर्व माहिती अवगत होती, मात्र चिनी सरकारनं हे लपवून ठेवलं होतं.


हाँगकाँग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये व्हायरलॉजी आणि इम्यूनोलॉजीमध्ये तज्ज्ञ असलेल्या डॉ. ली-मेंग यांना सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिकेत पळून जाण्यास भाग पाडलं गेलं होतं. ११ सप्टेंबर रोजी त्यांनी एका गुप्त स्थानावरुन ब्रिटिश टॉक शो “लूज वुमन” या मुलाखतीत भाग घेतला. या मुलाखतीत त्यांनी या विषयावरील आपलं संशोधन आणि या दरम्यान त्यांना चीनमध्ये कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागलं याविषयी स्पष्टीकरण दिलं.
डॉ. ली-मेंग यांनी सांगितले की, डिसेंबर आणि जानेवारी दरम्यान चीनमधील “न्यूमोनिया” या विषयावर त्यांनी दोन संशोधनं केली. त्यातील दुसरं संशोधन जानेवारीच्या मध्यभागी केलं. त्यांनी केलेल्या संशोधनाचा निकाल त्यांच्या पर्यवेक्षका समवेत सामायिक केला. त्यांचे हे पर्यवेक्षक जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) सल्लागार आहेत. डॉ. ली-मेंग यांनी असं अपेक्षित धरलं होतं की, त्यांचे पर्यवेक्षक डब्ल्यूएचओ च्या सहाय्यानं चिनी सरकारनं केलेल्या या कृत्यावर काहीतरी कारवाई करावी, मात्र झालं या विपरीत. त्यांना अचंबित करणारा हा सल्ला देण्यात आला असं सांगण्यात आलं की ‘त्यांनी या विषयावर कोणतंही वक्तव्य करू नये अन्यथा तुम्हाला धोका निर्माण होऊ शकतो. इतकच काय तर डॉ. ली-मेंग यांना गायब देखील केलं जाऊ शकतं असं सांगण्यात आलं.
या मुलाखतीदरम्यान त्यांनी असं सांगितलं की, “देशातील सर्व नागरिक घाबरलेल्या अवस्थेत होते, नागरिकांना चीन सरकार कडून सहकार्याची अपेक्षा होती, चीन सरकार आणि डब्ल्यूएचओ यांच्या एकत्रित सहकाऱ्यानं लवकरात लवकर मदत मिळावी अशी अपेक्षा सर्व नागरिक बाळगून होते. पण, या सर्वासाठी खूप कमी वेळ शिल्लक होता.”
त्याच वेळी चिनी नववर्ष देखील सुरू होत होतं. यामुळं जगभरातून मोठ्याप्रमाणावर लोकं चीन मध्ये ये-जा करत असतात. तर दुसरीकडं हा धोकादायक व्हायरस मोठ्या प्रमाणावर प्रसारित होण्याचा धोका होता. त्यामुळं त्यांना या वेळी शांत राहणं शक्य नव्हतं. “हा अतिशय धोकादायक व्हायरस त्यावेळी केवळ चीनमधील लोकांपुरताच नव्हे तर पूर्ण जागतिक स्तरावर देखील धोकादायक ठरणार होता. त्यामुळं मला शांत राहणं शक्य नव्हतं. त्यावेळी मला अनेक धमक्या देखील आल्या. पण, मी शांत राहणं पसंत केलं असतं तर मला नक्कीच पश्चाताप झाला असता.”असं त्यांनी सांगितलं.
१७ जानेवारी रोजी त्यांनी अमेरिकेतील प्रसिद्ध चीनी युट्यूबरशी संपर्क साधला. चिनी भाषेत असलेल्या व्हिडिओनं स्पष्ट केलं की:
(१) चीन सरकार व्हायरस विषयी माहिती लपवण्याचा प्रयत्न करत आहे,
(२) मानवापासून ते मानवापर्यंत हा व्हायरस सहजरीत्या संक्रमित होत आहे,
(३) सार्स-कोव्ह -२ (Sars-CoV-2) हा विषाणू अतिशय संक्रमण जन्य आहे व लवकरच पूर्ण जगासाठी हा धोका बनू शकतो.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या म्हणाल्या की “हा विषाणू निसर्गनिर्मित असून हा चिनी आर्मीच्या संस्थेतून तयार केला गेलेला आहे. या विषाणू निर्माता चिनी मिलिटरी संस्थेनं सीसी ४५ आणि झेडएक्ससी ४१ (CC45 and ZXC41) नावाचे काही धोकादायक कोरोनाव्हायरस देखील शोधले आहेत. या दोन धोकादायक विषाणूंच्या आधारेच आत्ताचा कोरोनाव्हायरस (कोविड -१९) तयार झालाय.”


हा व्हायरस वुहान शहरातील मार्केटमधून तयार झालेला नसून तो कृत्रिम रीत्या बनवला गेला आहे. चीन करत असलेला सी फूड मार्केट बाबतचा दावा त्यांनी फेटाळून लावला. होंग कोंग सोडण्यापूर्वी काही उच्चस्तरीय शास्त्रज्ञांच्या टीम सोबत ते या रिपोर्टवर काम करत होत्या. लवकरच याबाबत सर्व माहिती लोकांसमोर आणली जाईल असं त्यांनी सांगितलं.
अप्रकाशित संशोधनावर प्रकाश टाकत त्या म्हणाल्या, “जीनोम सिक्वेन्स हा आपल्या मानवी फिंगरप्रिंटसारखा आहे. मी सार्स-सीओव्ही -२ च्या अस्तित्वात असलेल्या जीनोम सीक्वेन्सच्या पुराव्यांचा उपयोग करून हा व्हायरस चीन मधूनच कसा आला हे स्पष्ट करणार आहे. हे संशोधन सामान्य व्यक्ती देखील वाचू शकतो याला जैव शास्त्रांमध्ये तज्ञ असण्याची आवश्यकता नाही. “
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे