हलदवानी १४ ऑगस्ट २०२० : उत्तराखंड मधील हलदवानी शहरातील अनेक संगीतकार आणि गायकांना कोव्हीड- १९ च्या साथीच्या रोगाने मोठा फटका बसला आहे. कारण सार्वजनिक मेळाव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. आणि लोक ही बाहेर यायला तयार नाही आहेत.
हे संगीतकार आता त्यांची प्रतिभा दर्शविण्यासाठी आणि उपजीविका मिळविण्यासाठी आपले व्हिडिओ सोशल मीडिया आणि यूट्यूब अशा प्लॅटफॉर्म वर टाकत आहेत . यामधून , जगभरातील लोक मदत करण्यासाठी संगीत क्षेत्राकडे वळले आहेत. हलदवानी स्टुडिओ डिझायनर केके भट्ट म्हणाले की, “संगीतकार आता आमच्या कडून वाद्ये आणि इतर स्टुडिओ उपकरणे खरेदी करीत आहेत. कोव्हिड शहरात कोणतेही कार्यक्रम होत नाही आहेत. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, हलदवानी मध्ये कोव्हिड १९ चे एकूण ६६८७ रुग्ण आढळले आहेत त्यापैकी ४०५९ सक्रिय रुग्ण आहेत. आणि तसेच १४० लोकांचा मृत्यू झाला आहे..
न्यूज अनकट प्रतिनिधी