श्री शंभुराज्याभिषेक ट्रस्टच्या वतीने कोरोना योद्धांचा होणार सन्मान

तुळापूर, दि.५ जून २०२० : तुळापूर येथे उद्या ( शनिवारी) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकत्रित न येता शिवराय मना मनात शिवराज्याभिषेक घरा घरात साजरा करून शिवरायांना एक आगळी वेगळी मानवंदना देण्यात येणार आहे.

शंभुराज्याभिषेक सोहळा तुळापूर संस्थापक शेखर पाटील, यांच्या संयुक्त विद्यमानाने कोरोना समन्वय समिती यांच्यावतीने कोरोना विषारी विषाणूचा वाढता प्रादुर्भाव असताना देखील ग्रामस्तरावर स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कोरोना योद्धांचा सन्मानपत्र देऊन सन्मान सोहळा संपन्न होणार आहे.

हा कार्यक्रम माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, व रामकृष्ण पाटील, यांच्याहस्ते होणार आहे. पाबळ गावचे उपसरपंच अमोल जाधव, मंचर गावचे सरपंच दत्ताभाऊ गांजळे, व हवेली तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर शिंदे यांना कोरोना योद्धा हे सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.

या प्रमाणपत्रामध्ये आपण या कोरोना (कोविड १९) महामारी च्या काळामध्ये कोरोना विरोधी लढाईत प्रत्यक्ष भाग घेऊन महामारी पासून सामान्य जनतेचे संरक्षण करण्यासाठी एका वॉरियर्स प्रमाणे लढा देत आहात. आपले गाव कोरोना मुक्त ठेवण्यास व अनेक ठिकाणी जाऊन नागरिकांना जीवनावश्यक वस्तू किंवा असे अनेक गरजा आपण आपल्या माध्यमातून करत आहात. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आपल्याला कोरोना योद्ध सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. आपण आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन आपणाला सन्मानित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम काही दिवसात मोजक्या लोकांच्या उपस्थित घेण्यात येणार आहे. असे शंभूराज्याभिषेक सोहळा संस्थापक शेखर पाटील यांनी “न्यूज अनकट” शी बोलताना सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा