कोरोना वेस्ट ला आता पिवळा हा कलर कोड असणार

मुंबई: केंद्रीय प्रदूषण नियंत्रण  मंडळानं  सर्व राज्यांना  जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन कायद्याअंतर्गत  कोरोना  विषाणूशी निगडीत  जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनाबद्दल  खबरदारी घेण्याबाबत सूचना केल्या होत्या.  याला प्रतिसाद देत महाराष्ट्र  प्रदूषण नियंत्रण मंडळानं यापुढे कोरोना वेस्ट म्हणजे उपचार, चाचण्या दरम्यान तयार झालेल्या जैववैद्यकीय कचऱ्यासाठी पिवळा हा कलर कोड असणार  ही सूचनावली तयार केली आहे.

महाराष्ट्र  प्रदूषण नियंत्रण मंडळानं कोरोना विषाणूसंदर्भातील सूचनावली तयार केली आहे. ही सूचनावली रुग्णालये, चाचणी शाळा,  सामान्य लोक,  होम क्वारंटाइन असलेल्या व्यक्ती यासाठी लागू करण्यात येतील. यापुढे कोरोना वेस्ट म्हणजे उपचार, चाचण्या दरम्यान तयार झालेल्या जैववैद्यकीय कचऱ्यासाठी पिवळा हा कलर कोड असणार आहे.

विषाणूसंदर्भातील सर्व जैववैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापन पूर्णपणे वेगळ्या पद्धतीनं करावं. हा कचरा दर्शवण्यासाठी पिवळा रंग वापरावा. हा  कचरा ज्या बॅग किंवा कचऱ्याच्या डब्ब्यात ठेवण्यात येईल तो ही पिवळ्या रंगाचा असावा  जेणेकरून हा  कोरोना विषाणूच्या उपचारांदरम्यान तयार झालेला जैववैद्यकीय कचरा आहे हे चटकन लक्षात येईल अशी सूचना महाराष्ट्र  प्रदूषण नियंत्रण मंडळानं  केली आहे.

रस्त्यावर थुंकणे बंद करा: उद्दव ठाकरे

‘जय हिंद, वंदे मातरम्, भारत माता की जय’ असे बोलण्यानेच राष्ट्रवाद जागा होतो असे नाही. सरकारी आदेश पाळणे व अशा प्रकारची महामारी वाढू नये यासाठी सहकार्य करणे हाही मोठा राष्ट्रवाद आहे. आपल्या लोकांनी रस्त्यावर थुंकणे बंद केले तरी कोरोना व्हायरसच्या निम्म्या केसेस कमी होतील,’ असं मत शिवसेनेनं करोनाच्या पार्श्वभूमीवर मांडलं आहे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा