लोणी काळभोर, दि.२७ मे २०२०: बकोरी (ता.हवेली) येथे बुधवार दि.२७ रोजी सर्वत्र पसरलेल्या कोरोनाच्या महामारीने निर्माण झालेल्या संकटाचा सामना करत नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांचे हस्ते किराणा किट देऊन सन्मान करण्यात आला.
शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार व पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता पवार, त्यांनी बकोरी ग्रामपंचायती मधील कर्मचारी त्याचप्रमाणे, अंगणवाडी सेविका, मदतनीस, अाशा सेविका, आरोग्य कर्मचारी, व गावातील ज्या कुणाला आधार नाही अशा कुटुंबांना किराणाचे कीट देऊन त्यांना मदतीचा हात पुढे केला .
या कार्यक्रमासाठी उपस्थितांमध्ये बकोरी गावचे उपसरपंच सुभाष वारघडे, ग्रामसेवक बापूसाहेब गव्हाणे, वारघडे कृषी उद्योग समूहाचे चेअरमन शांताराम वारघडे, व्हाईस चेअरमन गोरख वारघडे, त्याचप्रमाणे दादा बाबाजी वारघडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे, पंडित वारघडे, आमदारांचे प्रतिनिधी म्हणून इंगळे या सर्वांच्या उपस्थितीत सर्व नागरिकांना कीर्तनाचे किट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
कर्मचाऱ्यांच्या वतीने चंद्रकांत वारघडे यांनी आमदार अशोक पवार यांचे आभार मानले.
खऱ्या अर्थाने शिरूर हवेली तालुक्यांमध्ये गरजूंना मदतीचा हात पुढे करत असल्याने अनेक कुटुंबाला आधार मिळत असे “न्यूज अनकट” शी बोलताना चंद्रकांत वारघडे यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे