कोरोना योद्यांचे “मिलकर लढ़ना है हमे” गाण्याची सोशल मीडियावर धूम

मुंबई, दि.१७ मे २०२०: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. तो रोखण्यासाठी प्रशांनाकडून उपाय योजना करण्यात येत आहेत. कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी, शेतकरी असे अनेक जण कोरोनाचा प्रादुर्भाव असताना देखील जीवाची बाजी लावून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. यात सर्वांना आधार देण्यासाठी या रस्त्यातील कोरोना योद्यांनी एकत्र येत “मिलकर लढ़ना है हमे” हे गीत रसिकांच्या भेटीला आणले असून सोशल मीडियावर त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे सागर घोरपडे यांनी गायलेल्या या गीताला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. या गाण्यात कोलकाताचे पोलीस उपायुक्त अंगशुमन साहा, सातारच्या पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, सोलापूरचे अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पुणे क्राईम ब्रांचचे स.पोलीस आयुक्त विजय चौधरी, लातूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, मुंबईचे पोलीस उपनिरीक्षक वैशाली माळी, पुणे पोलीस सागर घोरपडे यांचा सहभाग आहे.

याशिवाय न्यूज रिपोर्टर वैभव बलकुंदे, वैद्यकीय कर्मचारी जगदीश त्रिवेदी, सुषमा त्रिवेदी, दत्ता गायकवाड, प्रशांत लबडे पाटील, एमएसईबी कर्मचारी सिमरन व्यास, फार्मसिस्ट प्रीती व्यास, शेतकरी जयशंकर पाटील, धीरज जाधव, बँक मॅनेजर अजय यादव हे रिअल हिरो स्क्रीनवर दिसून येत आहेत.

हे गाणेअमोल नाशिककर यांनी संगीतबद्ध केलं आहे. या गाण्याचे गीतकार अमोल नाशिककर व अजय यादव हे आहेत. या गाण्याला सागर घोरपडे व अमिता घुगरी यांनी स्वर दिले आहेत. तसेच गाण्याचे दिग्दर्शन अविराज जयशंकर यांनी केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा