वॉशिंग्टन, २७ सप्टेंबर २०२०: कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये विटॅमिन-डी’चं प्रमाण जेवढं अधिक असेल तेवढं या विषयामुळं मृत्यूचं प्रमाण कमी असल्याचा दावा केला गेलाय. यानुसार जर विटॅमिन-डी’चं प्रमाण पर्यंत असेल तर ५२ टक्के मृत्यूची जोखीम कमी होते. एका नवीन अभ्यासानुसार ही माहिती समोर आलीय. अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठाच्या संशोधकांनी हा अभ्यास केलाय.
संशोधकांना अशी माहिती मिळाली आहे की, ज्या रूग्णांमध्ये पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन-डी होते अशा रुग्णांना रुग्णालयात भरती केल्यानंतर त्यांची मृत्यूची जोखीम अर्ध्यापेक्षा कमी झाल्याचं पाहण्यास मिळालं. त्याचबरोबर, विटॅमिन-डी’मुळं गंभीर आजारी पडण्याचा धोकाही १३ टक्क्यांनी कमी असल्याचं दिसून आलं.
अभ्यासादरम्यान असं आढळलं की, ज्या रुग्णांमध्ये पुरेसं विटॅमिन-डी असतं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची गरज देखील ४६ टक्क्यांनी घटली आहे. शास्त्रज्ञ म्हणतात की, एखाद्या व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये विटॅमिन-डी महत्वाची भूमिका बजावतं, ज्यामुळं कोरोना रुग्णांना फायदा होतो.
अमेरिकेत सरासरी ४२ टक्के लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असल्याचं आढळून आलं. याच बरोबर श्वेत आणि वृद्ध लोकांमध्ये देखील तुलनात्मकदृष्ट्या विटामिन डी ची कमतरता अधिक आढळून आलीय. अशा लोकांना देखील या विषाणूची लागण अधिक प्रमाणात होताना दिसत आहे.
यापूर्वी बोस्टन युनिव्हर्सिटी’च्या मायकेल हॅलिक यांना एका संशोधनात असं आढळलं आहे की, ज्या लोकांना पुरेसे व्हिटॅमिन डी असतं त्यांना कोरोना विषाणूची लागण होण्याची शक्यता ५४ टक्के कमी आहे.
मागील अभ्यास पुढे नेत असताना शास्त्रज्ञांना कोरोना रुग्ण आणि विटॅमिन-डी यांच्यातील संबंधांबद्दल नवीन माहिती मिळाली. सध्याच्या टीम’नं तेहरानच्या रुग्णालयात २३५ कोरोना रुग्णांचे नमुने घेतले. ६७ टक्के रुग्णांमध्ये विटॅमिन-डी’चं प्रमाण ३० एनजी / एमएलपेक्षा कमी होतं.
तज्ञांच्या म्हणण्यानुसार इतर रोगांशी लढत असलेल्या रुग्णांमध्ये देखील विटॅमिन-डी’चं प्रमाण कमी असल्याचं आढळून आलं आहे. म्हणजे या संशोधनावरून असं समजतं की, जर लोकांमध्ये व्हिटॅमिन डी’ची कमतरता नसती तर कित्येक लोकांचे जीव वाचवण्यात यश आलं असतं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे