मुंबईत कोरोनाची धडकी भरवणारी वाढ, 20 हजार 318 नवीन रुग्ण, 5 मृत्यू

27

मुंबई, 9 जानेवारी 2022: सर्वत्र वाढत्या केसेसमध्ये मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचा स्फोट झालाय. आज येथे 20,318 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या 120 इमारती सील करण्यात आल्या आहेत. शहरात प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्याही येथे वाढत आहे.

याशिवाय आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतही तणाव वाढू लागला आहे. इथेही कोरोनाचे आकडे झपाट्याने वाढत आहेत. ज्यामध्ये धारावीमध्ये गेल्या 24 तासांत 147 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. यासह, आता धारावीमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 729 झालीय.

संसर्गाच्या बाबतीत महाराष्ट्र पुन्हा एकदा आघाडीवर आहे. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात कोरोनाचे 41,434 नवीन रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान 13 जणांचा मृत्यू झालाय. महाराष्ट्रात कोरोनासोबतच ओमिक्रॉन प्रकाराचे रुग्णही झपाट्याने वाढत आहेत. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 133 रुग्णांमध्ये Omicron प्रकाराची पुष्टी झालीय. नवीन रुग्ण आल्यानंतर राज्यात ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 1009 वर पोहोचली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे