‘आयपीएल’वर कोरोनाचे सावट, ‘या’ प्रशिक्षकाला झाला कोरोना

उदयपूर, १२ ऑगस्ट २०२०: आय पी एल सुरू होण्यापूर्वीच आय पी एल  वर कोरोनाचे सावट आलेले दिसत आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या फ्रेंचायझी राजस्थान रॉयल्सने (आरआर) बुधवारी जाहीर केले की सामना खेळण्यासाठी रवाना होण्यापूर्वी कोविड -१९ टेस्ट होणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने कोविड -१९ ची सर्व खेळाडूंची तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान त्यांचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दिशांत याग्निक हे कोरोना पॉझिटिव आढळले आहेत.

१९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या चित्तथरारक टी -२० लीगमध्ये भाग घेण्यासाठी ते संयुक्त अरब अमिरात (युएई) येथे रवाना होण्याच्या काही दिवस आधी असा प्रकार घडला आहे. राजस्थान रॉयल्सने एका निवेदनात याविषयी माहिती दिली. निवेदनात त्यांनी सांगितले की, ‘राजस्थान रॉयल्स हे सांगू इच्छित आहे की, आमच्या संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक दिशांत याग्निक यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव आला आहे.’

याबाबत स्पष्टीकरण देताना राजस्थान रॉयल्सने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सामना खेळण्यासाठी यूएईला रवाना होण्यासाठी सर्व खेळाडूंना मुंबईमध्ये एकत्र येण्यास सांगितले होते. ही गोष्ट लक्षात ठेवून सर्व खेळाडूंचे परीक्षण होणे गरजेचे होते.’ राजस्थान रॉयल्सने असे देखील सांगितले की, भारतीय क्रिकेट बोर्डाने ठरवून दिलेल्या नियमानुसार दोन चाचण्या होणे आवश्यक होते. परंतु, आम्ही या व्यतिरिक्त तिसरी चाचणी देखील घेतली.  संघामध्ये समाविष्ट असलेल्या सर्व खेळाडू, त्यांचे सहकारी व सहा खेळाडू या सर्वांची चाचणी यामध्ये करण्यात येणार होती.

सध्या याग्निक हे उदयपूर मध्ये आहेत. त्यांचा अहवाल पॉझिटिव आल्यामुळे त्यांना चौदा दिवस रुग्णालयामध्ये थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा