इंदापूर, दि.१३ ऑगस्ट २०२०: स्थानिक स्वराज्य संस्थेतील ग्रामपंचायत हा महत्त्वाचा पाया असतो. दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी गावामध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात येते.
यामध्ये ग्रामपंचायतीने केलेल्या कामाचा आढावा, तसेच पूर्वनियोजित कामे आदींबाबतीत ग्रामस्थांकडून सूचना मार्गदर्शन मागविण्यात येते. या ग्रामसभेमध्ये येणाऱ्या प्रश्नांवर विचारविनिमय करून ग्राम पंचायत प्रशासनाची पुढील भूमिका ठरविली जाते. परंतु, यंदा कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे धार्मिक कार्यक्रम, सभा, सांस्कृतिक कार्यक्रम यांना नियम अटी घालून दिल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर यंदा ग्रामसभा होणार की नाही याबाबतची उत्कंठा ग्रामस्थांमध्ये आहे. तसेच जर ग्रामसभा झाली नाही तर आमच्या समस्या कशा मांडाव्यात याविषयी देखील ग्रामस्थांच्या मनामध्ये संभ्रम पहायला मिळत आहे. त्यामुळे यंदा ग्रामसभा होणार की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – निखिल कणसे.