मुंबईत कोरोनाचा प्रभाव कमी होतोय ?

मुंबई, दि. ८ जुलै २०२०: भारतात कोरोनाने जसा शिरकाव केला तसा त्याने महाराष्ट्राच्या जीवाच्या मुंबईलाच आपले केंद्र बनवले होते. महाराष्ट्रातील हाॅटस्पाॅट असलेल्या मुंबईत कोरोनाला काही प्रमाणात का होईना प्रशासनाने रोखले म्हणायला सध्या तरी हरकत नाही. मुंबई मध्ये दिवसागणिक १००० पेक्षा जास्त रुग्ण आढळत होते. तर काल चक्क ७८५ नवे कोरोना रुग्ण आढळले जे गेल्या महिन्यापेक्षा सर्वात कमी आहेत.

मुंबई सारख्या दाट लोकवस्ती आसलेल्या शहरात कोरोनाने जसा शिरकाव केला तसा अनेक तज्ञांच्या मतांना उधाण आले होते. आणि त्यापेक्षाही परिणामकारक गोष्ट म्हणजे मुंबईतील धारावी जिथे १० बाय १० च्या जागेत ५ ते ८ लोक राहतात व ८ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या वस्तीत कोरोनाने जेव्हा शिरकाव करायला सुरवात केली तेव्हा प्रशासना समोर मोठे अव्हान समोर उभे ठाकले होते. या सर्व कठीण परिस्थित प्रशासनाने संयमाने कार्य करत आजच्या घडीला हे करुन दाखवले, तर धारावी देखील कोरोनामुक्तीच्या वाटेवर असून कालच्या दिवसात केवळ १ नवा कोरोना रुग्ण धारावीत सापडला आहे. तर अनेक रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात करुन घरी परतले तर काहींचा दुर्दैवी अंत झाला. पण, या सगळ्यात धारावीतील नागरिकांनी देखील प्रशासनाच्या नियमाचे पालन करुन सहकार्य केले ज्यामुळे हे शक्य झाले.

मुंबईत काल निदान झालेले रुग्ण – ७८५
कालचे मृत्यू – ६४
एकूण रुग्णसंख्या – ८६,५०९
एकूण मृत्यू – ५००२

मुंबईची लोकसंख्या दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारती, जगातली सर्वांत मोठी झोपडपट्टी, दमट हवामान, छोटी घरं अशा सगळ्याच गोष्टी या विषाणूच्या संसर्गाला पोषक आहेत. तरीही या महाकाय शहरात साथ आटोक्यात आली. याला कारण घराघरात जाऊन केलेली नागरिकांची तपासणी आणि काँटॅक्ट ट्रेसिंग हे असल्याचं सांगितलं जातं. काही प्रमाणात धोका कमी झाला असे मुंबईकरांना वाटत आसले तरी संपूर्ण संकट अजून टळलेलं नाही. राज्यात काल देखील ५००० पेक्षा आधिक कोरोना रुग्ण आढळले आसून महाराष्ट्रातील कोरोना रुग्णाची संख्या ही २ लाखा पेक्षा आधिक झाली आहे.


न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा