केरळ, ८ ऑगस्ट २०२०: काल शुक्रवारी झालेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातामध्ये असलेल्या प्रवाशांपैकी एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा खळबळजनक घटना समोर आली आहे. दुबईहून भारताकडे निघालेल्या एअर इंडियाच्या या विमानाला काल सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान अपघात झाला होता. केरळमधील कोझिकोड विमानतळावर हे विमान धावपट्टीला धडकले व फरफटत धावपट्टीच्या पुढे निघून गेले. ह्या विमानामध्ये एकूण १९१ (वैमानिक व सह वैमानिक तसेच कर्मचारी) प्रवासी होते. त्यातील एक प्रवासी कोरोना पॉझिटिव असल्यामुळे आता इतरांनाही कोरोना संसर्ग होण्याची भीती वाढली आहे.
सध्या विमान अपघाताबाबत चौकशी सुरू आहे. नागरी उड्डयन मंत्री हरदीपसिंग पुरी आणि परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांच्यासह केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन आणि राज्यपाल आरिफ मोहम्मद खान परिस्थितीची पाहणी करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडिया एक्स्प्रेस एएक्सबी १३४४, बोईंग ७३७ दुबईहून कोझिकोड येथे वंदे भारत मोहिमेअंतर्गत येत होते. शुक्रवारी केरळमध्ये मुसळधार पाऊस पडला. हे विमान कोझिकोड येथे दुबईहून १८४ प्रवासी आणि ६ चालक दल सदस्यांसह दाखल झाले होते. विमान दाखल होताना कोझिकोड येथे पाऊस पडत होता. खराब हवामान तसेच उंच ठिकाणी असलेले हे विमानतळ अशा दोन्ही परिस्थिती पाहता विमान लँडिंग होत असताना धावपट्टीवर आदळले. विमानाचा वेग पाहता विमान थांबण्यासाठी धावपट्टीवर पुरेशी जागा शिल्लक राहिली नव्हती त्या कारणाने विमान संरक्षण भिंतीला जाऊन असलेले व विमानाचे दोन तुकडे झाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी