राज्यावर पुन्हा कोरोनाचे सावट

पुणे, २१ फेब्रुवरी २०२१ ;जाणून घेऊयात महत्वाच्या शहरातील सध्य परिस्थिती

पुणे

राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे राज्यात अनेक आवश्यक ठिकाणी
नियम कडक करण्यात येत आहेत .
पुण्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय पुण्याचे पालक मंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे ,आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा करण्यात येत आहे. शहरातील हॉटेल्स ,बार रात्री ११ वाजेपर्यंत चालू राहणार आहेत, तसेच महाविद्यालये ,शाळा,क्लासेस येत्या २८ तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई

मुंबई महापालिकेने सुद्धा नियम कडक करत मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कडक आणि दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

औरंगाबाद

या शहरात पूर्वी रुग्णांना होम आयसोलेशन ची परवानगी होती मात्र रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता हि मुभा रद्द करण्यात अली असून रुग्णांना थेट कोविड सेंटर मध्ये जावे लागणार आहे. शहरातील सर्व कार्यालये, स्मशानभूमीच्या च्या आवारात मास्क शिवाय परवानगी नाही असे फलक लावण्यात आले आहेत.

नाशिक

नाशिक शहरात सुद्धा कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ९०० च्या घरात गेल्यानंतर महापालिका आयुक्त यांनी ऍक्शन घेत प्रतिबंधित क्षेत्रे करण्यापासून ते कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश जरी केले आहेत. तसेच गर्दी टाळण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा