हरियाणा, २४ एप्रिल २०२१: देशात पुन्हा एकदा कोरोनाचा धुमाकूळ मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. कोरोनामुळं अनेक मोठ मोठ्या क्षेत्रांना नुकसान झालं आहे. तसेच देशात गुन्हेगारी देखील या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्त होताना दिसत आहे. पण, या गुन्हेगारी विश्वातूनच एक विचित्र घटना समोर आलीय. ज्या मधे एका चोरानं “साॅरी” चिठ्ठी लिहून चहाच्या टपरीवर ठेवून निघून गेला.
नेमकं प्रकरण हे हरियाणाच्या जींद येथील रूग्णालयातील आहे. या रूग्णालयातून कोरोनाच्या तब्बल १७१० लशी चोरीला गेल्या होत्या. त्यामुळं एकच गोंधळ उडाला होता. कोरोना लशी चोरीला गेल्याची बातमी चोरांना समजताच त्यांनी या लशी परत केल्या आहेत. मुळात आपण चोरी केलेल्या लशी या कोरोनाच्या आहेत हे चोरांना माहितीच नव्हतं.
पण जेव्हा त्यांना ही गोष्ट कळली तेव्हा, साॅरी असं लिहिलेल्या पत्रासह कोरोना लशींचे सर्व डोस चोरांनी एका चहाच्या टपरीवर ठेवले. या घडल्या घटनेची चर्चा सध्या सोशल मिडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. एक तर कोरोना सारख्या या महामारीमुळे अनेक बेरोजगार हातें निर्माण झाली. तर याच नैराश्यतून देशातील तरूण हे गुन्हेगारी क्षेत्राकडं तर पोट भरण्यासाठी वळत नाहीत ना? असा प्रश्न सध्या चर्चेत आहेत. तर सरकारनं देखील या परिस्थितीतीचं पूर्णपणे विचार करून योग्य तो निर्णय घेणं गरजेचं आहे. आधीच देश कोरोनाशी लढा देत आहे तर देशातील अनेक कुटूंब हे पोटापाण्यासाठी एक वेळ भाकर मिळवी म्हणून लढा देत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव