रक्षाबंधन सणावर कोरोनाचे सावट


इंदापूर, ३ ऑगस्ट २०२० : बहीण भावाचे प्रेम वृद्धिंगत करणारा सण म्हणजेच रक्षाबंधन. मात्र यंदा कोरोनामुळे असलेला लॉकडाऊन, व गावा गावातून पाहुण्यांकडे जाण्यासाठी असलेली बंदी यामुळे बहीण-भावांच्या भेटीवर विरजण पडले आहे.

अनेकजण ऑनलाईन रक्षाबंधन साजरा करणार आहेत. कोरोनामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे यंदा रक्षाबंधन असून साजरा कसा करायचा हा प्रश्न पडला आहे.

दरवर्षीप्रमाणे बहिण आपल्या भावासाठी राखी घेऊन भावाकडे जाते. आणि हाच असा सण असतो ज्या दिवशी भाचे देखील आपल्या मामाच्या गावाला जाण्यासाठी उत्सुक असतात.परंतु यंदा कोरोनामुळे यावर विरजण पडले आहे.

कोणालाच या गावावरून त्या गावाला जाता येत नसल्याने यंदा रक्षाबंधन सण कसा करावा याचा प्रश्न पडला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा