ब्रिटिश राजा चार्ल्स तिसरा यांचा आज राज्याभिषेक सोहळा; सोहळ्यात भारतासह जगभरातून परदेशी मान्यवर रहाणार उपस्थितीत

लंडन, ६ मे २०२३: ब्रिटिश राजा चार्ल्स तिसरा यांचा आज राज्याभिषेक होणार आहे. लंडनमधील वेस्टमिन्स्टर अॅबे येथे आज (शनिवारी) ५० हजारांहून अधिक पाहुणे, राजघराणे आणि परदेशी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमात चार्ल्ससोबत त्यांची पत्नी राणी कॅमिला यांनाही परंपरेने मुकुट घालण्यात येणार. या सोहळ्यासाठी भारताच्या वतीने उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि त्यांची पत्नी सुदेश धनखड हे सपत्नीक लंडनला पोहोचले आहेत. त्यावेळी तिथे त्यांचे आदरपूर्वक स्वागत करण्यात आले.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि त्यांची पत्नी सुदेश धनखड अधिकृतपणे भारतातून या कार्यक्रमाचा भाग असतील. बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहे, जी कॉमनवेल्थ व्हर्च्युअल कॉयरची ओळख करून देण्यासाठी स्पोकन वर्ड परफॉर्मन्स देईल. याशिवाय लंडनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मुंबईतील दोन डब्बेवालेही सहभागी होत असून ते आपल्या लोकांचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. वारकरी समाजाने बनवलेली पुणेरी पगडी आणि शाल ते राजा चार्ल्स यांना भेट म्हणून देणार आहेत.

किंग चार्ल्सच्या धर्मादाय उपक्रमांचा भाग असलेल्या अनेक भारतीय समुदायातील सदस्यांनाही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळेल. सौरभ फडके, चार्ल्स फाऊंडेशनच्या बिल्डिंग क्राफ्ट प्रोग्रामचे पदवीधर आणि प्रिन्स फाउंडेशन स्कूल ऑफ ट्रॅडिशनल आर्ट्स हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि प्रिन्स ट्रस्ट ग्लोबल अवॉर्डने सन्मानित झालेला दिल्लीचा गल्फशा हे देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा