डास चावल्याने होते कोरोनाची लागण ?

जेनेवा, दि. १९ जुलै २०२०: कोरोना व्हायरसनं जगभर थैमान घातलं आहे. ज्या वेगानं कोरोना व्हायरस जगभरात पसरतोय, त्याच वेगानं त्यासंबंधी अफवा आणि गैससमजही पसरतायत. असाच एक गैरसमज म्हणजे, डासांमुळं कोरोना व्हायरस पसरत असल्याचा.

या गैरसमजातून अनेक लोक खबरदारी घेऊम घरगुती उपाय करायला लागले आहेत. लोकांची ही भिती खोटी आहे तर डासांमुळे कोरोना हा पसरत नाही. बाकी लोकांनी डासपासून उपाय करायला हवेत कारण त्यामुळे दुसरे आजार हे उद्भवतात.

जागतिक आरोग्य संघटनेनंच स्पष्ट करत. कोरोना व्हायरस डासांच्या माध्यमातून पसरतो याबाबत अद्याप कुठलीच माहिती मिळाली नाही किंवा पुरावा सापडला नाही, असं स्पष्ट शब्दात सांगितलं होतं, मात्र आता याबाबत नवी माहिती प्रसिद्ध झाली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने या संशोधनाच्या आधारे कोरोनाचा संसर्ग डासांमार्फत होत नाही असे जाहीर केले आहे. सायंटिफिक रिपोर्ट्स जर्नलमध्ये नवे संशोधन प्रसिद्ध झाले. ज्यामध्ये SARS-CoV-2 हा विषाणू डासांमार्फत माणसामध्ये पसरत नाही असं यात म्हटलं आहे. हा व्हायरस डासांच्या तीन प्रमुख प्रजातींमध्ये वाढू शकत नाही असं या अभ्यासात दिसून आलंय तर डास चावला तरी त्या व्यक्तीला संसर्ग होऊ शकत नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा